शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानांतर्गत तळेरे परिसरातून २१ टन कचरा गोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 17:00 IST

तळेरे : देश पातळीवर गांधी जयंतीनिमित्त राबविण्यात येणाºया स्वच्छता अभियानांतर्गत कणकवली तालुक्यातील तळेरे एस. टी. बसस्थानक ते स्मशानभूमीपर्यंतचा परिसर श्री सदस्यांनी स्वच्छ केला. सुमारे १ किलोमीटर अंतर मार्गाच्या दुतर्फा असलेला २१ टन कचरा गोळा करण्यात आला. यामध्ये तळेरे, नडगिवे, मुटाट, पाळेकरवाडी येथील २३० श्री सदस्य सहभागी झाले होते. गांधी जयंतीनिमित्त तळेरे ...

ठळक मुद्देगांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियान तळेरे, नडगिवे, मुटाट, पाळेकरवाडीतील २३० श्री सदस्य सहभागी स्वच्छता मोहिमेचे कौतुक 

तळेरे : देश पातळीवर गांधी जयंतीनिमित्त राबविण्यात येणाºया स्वच्छता अभियानांतर्गत कणकवली तालुक्यातील तळेरे एस. टी. बसस्थानक ते स्मशानभूमीपर्यंतचा परिसर श्री सदस्यांनी स्वच्छ केला. सुमारे १ किलोमीटर अंतर मार्गाच्या दुतर्फा असलेला २१ टन कचरा गोळा करण्यात आला. यामध्ये तळेरे, नडगिवे, मुटाट, पाळेकरवाडी येथील २३० श्री सदस्य सहभागी झाले होते. 

गांधी जयंतीनिमित्त तळेरे परिसरात श्री सदस्यांनी ही स्वच्छता मोहीम राबविली. तळेरे एस. टी. स्थानक परिसर, बाजारपेठ ते स्मशानभूमी असा सुमारे १ किलोमीटर अंतर परिसर यावेळी स्वच्छ करण्यात आला. 

महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्रभूषण पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना स्वच्छता अभियानाचे राजदूत म्हणून नियुक्त केले आहे. हे स्वच्छता अभियान हा सामर्थ्याचा भाग असल्याने बैठकीतील श्रीसदस्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार तळेरे परिसरात श्रीसदस्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. 

स्वच्छता मोहिमेचे कौतुक विशेष म्हणजे या स्वच्छता मोहिमेदरम्यान स्वयंप्रेरणेने सहभागी झालेल्या प्रत्येकामध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. त्या सर्वांची शिस्त, कार्य करण्याची पद्धत, कार्याबाबतची आवड व त्यांची तत्परता वाखाणण्याजोगी होती. स्वच्छतेसारखा राष्ट्रीय उपक्रम साध्य करण्यासाठी स्वेच्छेने एवढ्या मोठ्या संख्येने हजर राहिलेल्या व्यक्तींचे सर्वांकडून कौतुक करण्यात येत होते.  

या स्वच्छता मोहिमेमध्ये श्री सदस्यांसह तळेरे आदर्श व्यापारी संघटना सहभागी झाली होती. या स्वच्छता मोहिमेबद्दल तळेरे ग्रामपंचायतीने श्री सदस्यांना पत्र देऊन विशेष आभार मानले. तसेच तळेरे आदर्श रिक्षा संघटनेच्यावतीने त्यांचे आभार मानण्यात आले.