शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

आंगणेवाडीसाठी १५0 जादा गाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2016 23:59 IST

भराडीदेवी यात्रेसाठी एस.टी. सज्ज : फिरते दुरूस्ती पथक कार्यरत, विभाग नियंत्रकांची माहिती

कणकवली : दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या यात्रोत्सवासाठी एस. टी. प्रशासन सज्ज झाले आहे. कणकवली, मालवण व कुडाळसह अन्य तालुक्यातून विविध ठिकाणांहून भाविकांच्या सोयीसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. या यात्रेसाठी एस.टी.च्या सिंधुदुर्ग विभागातून १५० गाड्यांचा ताफा जादा वाहतुकीसाठी सज्ज ठेवण्यात आला आहे. सावंतवाडी, वेंगुर्ले, देवगड, विजयदुर्ग या आगारांच्या कार्यकक्षेतील परिसरातूनही प्रवासी उपलब्धतेनुसार एस.टी.च्या जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. २५ फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच या गाड्यांची सोय उपलब्ध करण्यात आली असून २६ फेब्रुवारीपर्यंत ही सेवा सुरु राहणार आहे. २४ फेब्रुवारी रोजी प्रवाशांचा ओघ पाहून जादा गाड्यांची सोय करण्यात येणार आहे. आंगणेवाडी येथे भाविकांच्या सोयीसाठी प्रवाशी शेड व ३ वाहतूक केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यामध्ये मालवण विभागासाठी केेंद्र क्रमांक १, कणकवली व कुडाळसाठी केंद्र क्रमांक २ तर मसुरे विभागाकरीता केंद्र क्रमांक ३ ची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना एस. टी. मध्ये सुलभ प्रवेश मिळावा यासाठी ‘क्यू’ रेलिंगची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे. या वाहतूक केंद्रांवर दूरध्वनी, पिण्याचे पाणी, फिरती मुतारी, विजेची सोय, ध्वनीक्षेपक, डिझेल, फिरते दुरुस्तीपथक, क्रेन तसेच वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून फिरते गस्त पथकही तैनात राहणार आहे. नियंत्रण केंद्रांवर अधिकारी, पर्यवेक्षकीय कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी यांचा ताफा अहोरात्र उपलब्ध राहणार आहे. आंगणेवाडी येथे जाण्यासाठी एस.टी.च्या विविध आगारातून सोडण्यात येणाऱ्या गाड्यांबरोबरच जादा गाड्यांची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. यामध्ये कणकवली-सावंतवाडी ४ गाड्या, स्थानिक पातळीवरून आंगणेवाडीकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये घोटगे २ गाड्या, कडावल १, पणदूर सिंधुदुर्गनगरी ते आंगणेवाडी ३, पाट परुळेवरून ३, कट्टा कुणकवण १, कट्टा गुरामवाडी १, खरारे-मोगरणे २, कुडाळ निरुखे पांग्रडमार्गे ११, तिरवडेवरून १, कसाल हिवाळेवरून ४, कसाल खोटलेवरून ४ गाड्या तैनात ठेवण्यात येणार आहेत. हुबळीचा माळ ते आंगणेवाडी १, मालवणवरून १५ गाड्या, टोपीवाला हायस्कूल ते आंगणेवाडीपर्यंत ३ गाड्या ठेवण्यात आल्या असून या गाड्या सातत्याने फेऱ्या मारणार आहेत. देवबाग-तारकर्लीवरून ४, आनंदव्हाळवरून १, डांगमोडे १, सर्जेकोट १, मालवण १ अशा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या माध्यमातून भाविकांची ने-आण करण्यात येणार आहे. मसुरेवरून ६, पोईपवरून १, चौके-देवली १, देवली-वायरी १, वराड १, सुकळवाड-तळगाव १, बांदिवडे-मसुरे १ अशा गाड्या धावणार आहेत. कणकवली आगारातून ३७ गाड्या, असगणी-असरोंडीवरून २, रामगडवरून १, देवगड २, आचरा ४, हिंदळे मुणगे ३, तोंडवली-तळाशिल १, कुडोपी १, आरे-निरोम १, आचरा-चिंदर-त्रिंबक १ गाडी असे नियोजन करण्यात आले आहे. (वार्ताहर) यात्रेचे नियोजन : रेल्वेस्थानक ते आंगणेवाडी थेट गाड्या यात्रोत्सवासाठी अनेक भाविक रेल्वेने सिंधुदुर्गात दाखल होत असतात. त्यांच्या सोयीसाठी कणकवली, कुडाळ, सिंधुदुर्गनगरी, वैभववाडी या रेल्वे स्थानकांवरून प्रवाशांच्या उपलब्धतेनुसार आंगणेवाडीपर्यंत एस.टी.ची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना सोयीचे होणार आहे. भाविकांसाठी २१ ते २५ फेब्रुवारीपर्यंत कणकवली रेल्वे स्टेशन येथून मालवण व आंगणेवाडी परिसरात जाणाऱ्या प्रवाशांसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. एस.टी. सेवेचा लाभ घ्या : हसबनीस भाविकांच्या सोयीसाठी त्यांच्या मागणीनुसार एसटीच्या गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दोन दिवसांच्या या यात्रेकरीता जास्तीत जास्त एस.टी. गाड्या सोडून भाविकांना वेळेत यात्रास्थळी नेण्याचे नियोजन केले आहे. सुरक्षित प्रवासासाठी एसटीच्या सेवेचा लाभ घ्या, असे आवाहन विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी केले आहे.