शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

दहा स्थानकांसाठी १५0 कोटींचा निधी

By admin | Updated: June 17, 2016 23:51 IST

सुरेश प्रभू यांची माहिती : खारेपाटण रेल्वेस्थानकाचा शिलान्यास समारंभ

खारेपाटण : कोकण रेल्वे ही केवळ कोकणचीच नाही तर महाराष्ट्राबरोबर गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांचीही जीवनरेखा बनली आहे. सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण गावातील रेल्वेस्थानकामुळे खारेपाटण परिसराचा विकास होणार असून, या स्थानकासाठी १५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावरील अन्य १० स्थानकांसाठी १५० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. तर कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे कामही प्रगतीपथावर आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.खारेपाटण येथील नवीन रेल्वेस्थानकाचा शिलान्यास समारंभ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रिमोट कंट्रोलने गोवा-मडगाव येथून सुरेश प्रभू यांनी केला. यावेळी मडगाव येथे गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा, गोवा विधानसभा अध्यक्ष अनंत शेट, रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता, आदी अधिकारी उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचा आॅनलाईन शिलान्यास सोहळा खारेपाटण येथील शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयाच्या सभागृहात झाला. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, प्रांताधिकारी संतोष भिसे, खारेपाटण सरपंच तृप्ती माळवदे, चिंचवली सरपंच अनिल पेडणेकर, संघर्ष समिती अध्यक्ष नासिर काझी, उपसरपंच कमलेश धुमाळे, कोकण रेल्वेचे अधिकारी राजेंद्र कुमार, महाप्रबंधक सिद्धेश्वर तेलगू, बाळासाहेब निकम, रत्नप्रभा वळंजू, बाळा जठार, रवींद्र शेट्ये, अ‍ॅड. हर्षद गावडे, सचिन सावंत, कांताप्पा शेट्ये, आदी उपस्थित होते. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामाला सुरवात करण्यात येत असून रोहा ते वीर दरम्यान हे काम चालू आहे. हे काम सूरू असताना रेल्वे सेवेत कोणताही खंड पडणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना अभियंत्यांना देण्यात आली आहे. सावंतवाडी टर्मिनस होणार नाही, अशी भाषा करणाऱ्यांना सांगावेसे वाटते की, १९ जून रोजी टर्मिनसच्या कामाचा प्रारंभ होेणार आहे. याच वेळी कोकण रेल्वेच्या व भारतीय रेल्वेच्या विविध उपक्रमांचाही प्रारंभ होईल. देवगड जामसंडे येथे फळप्रक्रिया उद्योगावर आधारित प्रकल्प निर्मिती तसेच विजयदुर्ग-वैभववाडी-कोल्हापूर मार्ग व चिपळूण-कराड रेल्वे मार्गाचे कामदेखिल येणाऱ्या काळात हाती घेण्यात येणार आहे. खारेपाटण येथील सुख नदीवर ब्रीज बांधून रत्नागिरी व सिंंधुदुर्ग जिल्ह्याला रेल्वेशी जोडण्यात येणार आहे. असेही प्रभू म्हणाले. खारेपाटण रेल्वेस्थानकाचे आॅनलाईन भूमीपूजन सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाल्यानंतर चिंचवली येथे रेल्वे स्थानकाच्या नियोजित जागी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते कामाचा श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला. (वार्ताहर) संघर्ष समिती, समन्वय समिती व्हावीमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, खारेपाटण रेल्वेस्टेशन हे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणारे स्थानक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावरती असल्याने त्याला महत्त्व आहे. या रेल्वे-स्थानकाच्या माध्यमातून खारेपाटणला गतवैभव प्राप्त होईल. या रेल्वेस्थानकासाठी स्थापन करण्यात आलेल्या संघर्ष समिती ऐवजी समन्वय समिती म्हणून ती यापुढे कार्यरत व्हावी.