शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

ओरोस येथे १५ रोजी 'जातीय प्रवृत्तीचा मडका फोड' आंदोलनांतर्गत मोर्चा!

By सुधीर राणे | Updated: September 11, 2022 16:18 IST

परिवर्तनवादी विचारसरणीचे हजारो लोक सहभागी होणार 

लोकमत न्यूज नेटवर्क 

कणकवली(सुधीर राणे): मानवतेला काळीमा फासणाऱ्या  अनेक घटना देशभरात घडत आहेत . तसेच सिंधुदुर्ग जिल्हयातही जातीय अत्याचाराचे प्रकार घडत असतात. त्याला आळा बसावा या उद्देशाने जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीसह सर्व बौद्ध धर्मिय, चर्मकार समाज, मुस्लिम संघटनांनी मिळून ' जातीय प्रवृत्तीचा मडका फोड'आंदोलना अंतर्गत मोर्चा आयोजित केला आहे. 

हा मोर्चा गुरुवार १५ सप्टेंबरला सकाळी ११.३० वाजता ओरोस येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहे . मोर्चामध्ये परिवर्तनवादी विचारसरणीचे लोक हजारोंच्या संख्येने सहभागी होणार असल्याचा विश्वास विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी येथे व्यक केला. या मोर्चाच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी कणकवली, टेंबवाडी येथील म्हाळसाबाई हिंद छात्रालय येथे रविवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, कास्ट्राईबचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष  संदीप कदम , सत्यशोधक संघटनेचे नेते अॅड. सुदीप कांबळे, चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजीत जाधव , सरचिटणीस चंद्रसेन पाताडे ,भारतीय चर्मकार समाज संघटनेचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत पवार , वंचित आघाडीचे जिल्हा महासचिव प्रमोद कासले, वंचितचे जिल्हा युवक आघाडी अध्यक्ष रोहन कदम , कणकवली तालुकाध्यक्ष संजय जाधव , उपाध्यक्ष संजय तांबे ,चर्मकार संघटनेचे तालुकाध्यक्ष महानंदा चहाण , कास्ट्राईबचे किशोर कदम आदी उपस्थित होते. सुजित जाधव म्हणाले, जिल्हात बौद्ध व चर्मकार समाज एकत्र येऊन पहिल्यांदाच अशा प्रकारच्या भव्य मोर्चाचे आयोजन करत आहे.मुस्लिम समाजाशीही आमचे बोलणे सुरु आहे. यापुढे जिल्ह्यातील अनुसूचित जाती जमातीचे लोक अन्याय सहन करणार नाहीत. या मोर्चाद्वारे आमच्या एकीची ताकद दाखविणार असल्याचा विश्वासही त्यांनी  व्यक्त केला. 

दरम्यान, १५ सप्टेंबर रोजी मोर्चेकरी सकाळी ११ वाजता ओरोस येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे जमणार आहेत . तेथे  पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून  मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघणार आहे. तिथे  मोर्चाचे सभेत रुपांतर होईल जिल्हाधिकारी यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्याशी झालेल्या चर्चेची माहिती मोर्चेकऱ्यांना दिली जाईल. मोर्चात शालेय विद्यार्थी अग्रस्थानी असतील. असेही यावेळी महेश परुळेकर,संदीप कदम म्हणाले. 

टॅग्स :Kankavliकणकवली