शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
2
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिसांना...
3
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
5
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
6
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
7
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
8
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
9
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
10
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
11
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
12
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
13
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
14
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
15
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
16
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
17
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
18
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
19
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
20
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!

वैभव नाईकांसह १४ जणांना अटक

By admin | Updated: May 4, 2016 00:31 IST

कायदेभंग वाळू आंदोलन : १५ हजारांच्या जामिनावर मुक्तता

मालवण : महसूल प्रशासनाच्या कारवाई विरोधात कालावल खाडी किनारी कायदेभंग आंदोलन करून सरकारी कामात अडथळे, पर्यावरणाचा ऱ्हास करून बंदी असताना वाळू चोरी तसेच शिवीगाळ, दमदाटी, धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य १४ संशयितांनी मंगळवारी मालवण पोलिसांत शरणागती पत्करली. पोलिसांनी अटक केल्यानंतर दुपारी मालवण न्यायालयात हजर केले असताना न्यायाधीश संतोष चव्हाण यांनी आमदारांसह १४ संशयितांना १५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जामिनावर मुक्त केले.दरम्यान, कायदेभंग आंदोलनाला एक वर्ष उलटले तरी गुन्हा दाखल असलेल्या आमदार नाईक यांच्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याने आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत आवाज उठविला होता. त्यानुसार पोलिस प्रशासनाने नाईक व अन्य संशयितांना अटक करण्याची तयारी केली होती. मंगळवारी दुपारी आमदार नाईक व अन्य १४ संशयितांनी मालवण पोलिस ठाण्यात शरणागती पत्करली. पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महादेव जाधव, डॉ. सागर वाघ, मारुती जगताप, नितीन केराम यांनी अटकेची प्रक्रिया करून दुपारी मालवण न्यायालयात हजर केले. महसूल प्रशासनाच्या अन्यायकारक कारवाई व दंड वसुलीबाबत आमदार वैभव नाईक व सहकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत २९ एप्रिल २०१५ रोजी मालवण कालावल खाडी किनाऱ्यावर कायदेभंग आंदोलन छेडले होते. त्यानंतर मालवणच्या तहसीलदार वनिता पाटील यांनी मालवण पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. (प्रतिनिधी)जनतेच्या अन्यायाला वाचा फोडणारचसंशयितांच्या वतीने अ‍ॅड. उल्हास कुलकर्णी यांनी काम पाहताना अनेक युक्तिवाद मांडले. तब्बल तीन तासानंतर सशर्त जामिनावर मुक्ततेचे न्यायाधीशांनी आदेश दिले. वाळू आंदोलन हे जनआंदोलन होते. जनतेच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण आंदोलन केले होते. ओरोस येथे झालेल्या डंपर आंदोलनातील अन्य संशयितांना अटक करण्याची मागणी आपण करणार नाही. जनतेने आपल्याला आमदार बनवले आहे. त्यामुळे आपण नेहमीच जनतेसोबत राहू, असे आमदार नाईक यांनी प्रतिक्रिया दिली.एक वर्षानंतर अटकेची कारवाईमहसूल प्रशासनाच्या विरोधात कायदेभंग आंदोलन छेडल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयितांना तब्बल एका वर्षाने पोलिसांनी अटक केली. त्यामुळे न्यायालय संशयितांबाबत कोणता निर्णय घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते.दुपारी सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले. सायंकाळी उशिरा आमदार वैभव विजय नाईक यांच्यासह बबन विठ्ठल शिंदे, संतोष लक्ष्मण गावकर, पंढरीनाथ (भाऊ) सुरेश हडकर, गणेश लक्ष्मण तोंडवळकर, योगेश घन:श्याम भिसळे, अरुण (आबा) दयाळ खोत, रुपेश (विश्वास) खोत, स्वप्नील (बंटी) रघुवीर पेडणेकर, शेखर अंकुश तोंडवळकर, सतीश मुकुंद प्रभू, दिनेश पांडुरंग साळकर, कल्याण नंदू पाटील, यतीन परशुराम खोत या चौदा संशयितांची १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्यात आली.