शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इन्सुली नाक्यावर १४ लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 22:58 IST

बांदा : इन्सुली तपासणी नाक्यावर गोव्याहून मळगावच्या दिशेने ट्रकमधून केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १४ लाख रुपये किमतीच्या दारूसह एकूण १७ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक ...

बांदा : इन्सुली तपासणी नाक्यावर गोव्याहून मळगावच्या दिशेने ट्रकमधून केल्या जाणाऱ्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत १४ लाख रुपये किमतीच्या दारूसह एकूण १७ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतुकीविरोधात बांदा पोलिसांची ही सर्वांत मोठी कारवाई आहे. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक एकनाथ रमेश शेर्लेकर (वय ३४, रा. शेर्ले-तेलीवाडी) याला अटक केली.याला मदत करणारे रविराज अंबाजी सावंत (२६, रा. तांबोळी-खालचीवाडी) व कृष्णा रमेश शेर्लेकर (३०, रा. शेर्ले-तेलीवाडी) यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी सायंकाळी ६.०० च्या दरम्यान करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक यांनी बांदा पोलीस ठाण्याला भेट देत कारवाईची माहिती घेतली.अधिक माहिती अशी की, सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास बांदा सहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांना गोव्याहून मळगावच्या दिशेने ट्रकमधून बेकायदा दारू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार तपासणी नाक्यावर निरीक्षक कळेकर यांनी आपले सहकारी हवालदार बापू झोरे, पप्या पावसकर, नागेश गावकर, हेमंत पेडणेकर, विक्रांत मोरे यांच्यासह सापळा रचला. येणाºया ट्रकला (एमएच ०४-डिके-४७०३) तपासणीसाठी थांबविण्यात आले. ट्रकची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा ३३५ खोकी आढळली.पोलिसांनी तपासणी करून आतील गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे १४ लाख रुपये किमतीचे तब्बल ३३५ खोकी जप्त केली तर ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रक ताब्यात घेतला. याप्रकरणी ट्रकचालक एकनाथ शेर्लेकर याला अटक केली. त्याला मदत करणारे रविराज सावंत, कृष्णा शेर्लेकर यांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले. अधिक चौकशी रात्री उशिरापर्यंत सुरू होती.