शहरं
Join us  
Trending Stories
1
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
2
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
3
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
8
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
9
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
10
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
11
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
12
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
13
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
14
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
15
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

विद्यार्थ्यांकडून १३० किलोमीटरचा सायकल प्रवास

By admin | Updated: January 11, 2016 00:35 IST

विद्यार्थ्यांचे कौतुक : अ‍ॅड़ बाबासाहेब नानल गुरुकुलची रत्नागिरी - आंबोळगड यशस्वी सायकल सफर

रत्नागिरी : अ‍ॅड. बाबासाहेब नानल गुरुकुल म्हणजे उपक्रमातून शिक्षण देणारा रा. भा. शिर्के प्रशालेचा गुरुकुल प्रकल्प! विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गुरुकुल अनेक उपक्रमांचे आयोजन करत असते. त्यापैकीच एक म्हणजे सायकल सहल होय. गुरुकुलमधील इयत्ता पाचवी ते सहावीच्या विद्यार्थ्यांची रत्नागिरी ते पावस अशी सायकल सहल आयोजित करण्यात आली होती, तर सातवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची सायकल सहल रत्नागिरी ते आंबोळगड अशी आयोजित करण्यात आली होती.गुरुकुल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रघुवीर भिडे व गुरुकुलचे पालक यांच्या उपस्थितीत या सायकल सहलीचे उद्घाटन झाले. त्यानंतर रत्नागिरीतील शिर्के हायस्कूलमधून सायकल सहलीला सुरुवात झाली. सायकल चालविण्यास मुले फारच उत्सुक होती. सकाळी ११ वाजता सर्व मुले पावस येथे पोहोचली. त्यातील इयत्ता पाचवी ते सहावीच्या मुलांनी स्वामी स्वरुपानंदांचे दर्शन घेऊन दुपारी २ वाजता परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. उर्वरित मुले आंबोळगडाच्या दिशेने रवाना झाली. सायंकाळी ६.३० वाजता ही सर्व मुले आंबोळगडावर पोहोचली. तेथे रात्रभराच्या विश्रांतीनंतर सकाळी ९ वाजता परतीच्या प्रवासाला निघाली व रत्नागिरीत ५.३० वाजता या विद्यार्थ्यांचे रत्नागिरीत आगमन झाले.ही महत्त्वाकांक्षी सायकल सहल यशस्वी करण्यासाठी गुरुकुल प्रमुख राजेश आयरे, शिक्षक किरण सनगरे, स्वप्नील कर्लेकर, पल्लवी घोसाळे, देवराम दळवी, सुशांत पवार व गुरुकुलचे पालक शिवाजी सरगर, संदीप पाटील यांची मदत झाली. या सायकल उपक्रमाचे यशस्वी आयोजन व नियोजन गुरुकुलचे शिक्षक गौरव प्रकाश पिळणकर यांनी केले. (प्रतिनिधी)