शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
4
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
5
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
6
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
7
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
8
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
9
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
11
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
12
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
13
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
14
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
15
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
16
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
17
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
18
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
19
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
20
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...

दीड लाख भाविकांनी घेतले बाबरशेखांचे दर्शन

By admin | Updated: February 4, 2015 23:53 IST

गावातील अनेक तरूणांनी या खेळात सहभाग घेतला होता. बाबरशेखावर श्रद्धा असणारे अनेक लोक या खेळात आपल्यावर जीवघेण्या शस्त्रांचा मारा करून घेतात.

टेंभ्ये : हातिस येथील पीर बाबरशेख उरूसाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यंदा दीड लाखापेक्षा अधिक भाविकांनी बाबरशेखांचे दर्शन घेतल्याचे हातिस ग्रामविकास मंडळाच्या स्वयंसेवकांकडून सांगण्यात आले. हातिसमधील युवकांनी दर्ग्यावर केलेली फुलांची सजावट भाविकांना आकर्षित करून गेली. पण, रस्त्याच्या दुरावस्थेबाबत मात्र नाराजीचा सूर ऐकायला मिळाला.मंगळवारी पहिल्यादिवशी रात्री चंदनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर प्रथम हातिस येथील व नंतर इब्राहीम पट्टण येथील ग्रामस्थांनी बाबरशेखांच्या कबरीवर गिलाफ चढवला. त्यानंतर, सुरु झालेला शस्त्रास्त्रांचा खेळ पाहण्यास भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गावातील अनेक तरूणांनी या खेळात सहभाग घेतला होता. बाबरशेखावर श्रद्धा असणारे अनेक लोक या खेळात आपल्यावर जीवघेण्या शस्त्रांचा मारा करून घेतात. यानंतर, गाऱ्हाणी घालण्याचा कार्यक्रम सुरु करण्यात आला. बुधवार संध्याकाळपर्यंत भाविकांच्या माध्यमातून मनोभावे गाऱ्हाणी घातली जात होती.बुधवारी पहाटेपासून भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पहायला मिळत होते. दुचाकी, चारचाकी, एस.टी. बसेस व चालत जाणाऱ्या भाविकांमुळे रस्त्याल मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत होती. वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने, अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होताना दिसत होती. यावेळी पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत होती. दुसऱ्या दिवशी भाविकांनी केलेली प्रचंड गर्दी, हे यावर्षीच्या उरूसाचे एक प्रमुख वैशिष्ट्य पहायला मिळत होते. बुधवारी संध्याकाळी उशिरापर्यंत भाविक मोठ्या संख्येने दर्शनाला येत होते. हातिसमधील युवकांनी दर्ग्याच्या भिंतीवर फुलांची केलेली सजावट लक्षवेधी होती.दर्शनाला येणाऱ्या भाविकांमधून रस्त्याच्या दुरवस्थेबाबत मात्र नाराजी व्यक्त केली जात होती. वास्तविक उरूसाच्यापूर्वी रस्त्याचे डांबरीकरण होणे अपेक्षित होते. प्रशासनाने मात्र याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. (वार्ताहर)‘गैरसोय होणार नाही’ यासाठी प्रयत्नशीलपीर बाबरशेख उरुसाला संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येतात. अतिशय मनोभावे पीर बाबरशेखांचे दर्शन घेऊन, आपले गाऱ्हाणे त्यांच्यासमोर मांडतात. हातिस ग्रामविकास मंडळाच्यावतीने भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातात. ऊरुस यशस्वी होण्यामध्ये, भाविकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे, हातिस ग्रामविकास मंडळाच्यावतीने भाविकांना धन्यवाद देत असल्याचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर यांनी सांगितले.