शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

११ विद्यार्थ्यांना मिळाले सुवर्ण पदक

By admin | Updated: February 18, 2015 23:45 IST

राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा : कासार्डे विद्यालयाचे यश

नांदगांव : स्टार कला अकादमी कोल्हापूर आयोजित राज्यस्तरीय रंगभरण चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत कणकवली तालुक्यातील कासार्डे माध्यमिक विद्यालयाच्या ११ विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय फाईव्हस्टार मानांकनासह गोल्ड मेडल व सन्मानपत्रक प्राप्त झाले आहे.या राज्यस्तरीय स्पर्धेचा प्राथमिक निकाल सोमवारी जाहीर झाला. या स्पर्धेत विद्यालयातील ४०० मुलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत फाईव्हस्टार मानांकनासह गोल्ड मेडल प्राप्त झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये पृथ्वीराज माळवदे, कमलेश लाड, सायली पालव, शुभम घाडी, धीरज राणे, जान्हवी राणे, नेहा सुवारे, हर्षला घाडी, साईप्रसाद बिजितकर यांना गोल्डमेडल, तर सर्वेश पाताडे व दिव्यश्री मारकड यांचा समावेश आहे. त्यांना राज्यस्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत गोल्डमेडल, फाईव्हस्टार मानांकन, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.याशिवाय प्रशालेच्या उत्कृष्ट सहभागाबद्दल व उज्ज्वल यशाबद्दल कलाध्यापक सी. एस. कल्याणकर यांना स्टार कलाध्यापक व मुख्याध्यापक पी. एस. पाटील यांना स्टार मुख्याध्यापक पुरस्कार प्राप्त झाला आहे. २८ मार्च २०१५ रोजी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे स्टार कला अकादमीच्यावतीने यशस्वितांचा सत्कार समारंभ होणार आहे.सर्व यशस्वितांचे कासार्डे विकास मंडळाचे सर्व पदाधिकारी, स्थानिक व्यवस्था कमिटीचे कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, कार्यवाह मधुकर खाडये, सुभाष पाताडे, रवींद्र पाताडे, प्राचार्य पी. एस. पाटील, उपमुख्याध्यापक ए. बी. शेख, पर्यवेक्षक ए. ए. मुद्राळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)