शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
5
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
6
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
7
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
8
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
9
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
10
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
11
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
12
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
13
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
14
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
15
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
16
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
17
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
18
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
19
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन
20
एसटीप्रमाणे आरटीओच्या जागांचाही विकास; प्रताप सरनाईक यांचे आढावा घेण्याचे निर्देश

‘गणपतीपुळे’त बुडताना ११ जणांना वाचवले

By admin | Updated: July 20, 2015 00:07 IST

दोघींचा समावेश : २४ तासांत दोन घटना

गणपतीपुळे : गणपतीपुळे समुद्रामध्ये पाण्याचा अंदाज न आल्यामुळे बुडालेल्या वेगवेगळ्या दोन ग्रुपमधील सातजणांना वाचविण्यात यश आले असून, रविवारी दिवसभरात सुमारे अकराजणांना वाचवण्यात येथील स्थानिक तरुणांना यश आले आहे.जोडून सुट्ट्या आल्यामुळे गणपतीपुळे येथे गर्दी झाली होती. त्यातच खवळलेला समुद्र व वाढलेले समुद्राचे पाणी यामुळे चौपाटीवर सुरक्षारक्षक समुद्रामध्ये आंघोळीसाठी जाऊ नये, असे सांगत असतानाच कैलास श्रीरंग खटावकर (वय ४६), सुवर्णा श्रीरंग खटावकर (३८), मानसी श्रीरंग खटावकर (१८) व प्रथमेश श्रीरंग खटावकर (१५) हे कुटुंब गणपतीपुळे पर्यटन निवासासमोर समुद्रामध्ये आंघोळ करीत होते.मानसीला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्यात बुडत असतानाच तिला वाचवण्यासाठी गेलेल्या श्रीरंग खटावकर व सुवर्णा खटावकर हेही बुडू लागले. मात्र यावेळीच आरडाओरडा झाल्याने समुद्राच्या काठावर व्यवसाय करणाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ धाव घेत या तिघांनाही सुखरूप बाहेर काढले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडून काही मिनीटे होतात न होतात तोपर्यंत गणपतीपुळे मंदिराजवळ समुद्राच्या पाण्यात अहमदनगर येथून सहलीसाठी आलेल्या अनिल बी. दौंड (३६), जयराज घाघ (२२), सचिन नेटे (२३), विनायक दहिरे (२२) हे आंघोळीसाठी समुद्रामध्ये उतरले. विनायकला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले. सचिन व जयराज यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र विनायकचा हात सुटला. त्यावेळेस तेथील व्यावसायिकांनी दोरी व रिंगच्या सहाय्याने त्यांना सुखरूप बाहेर काढले. या दोन्ही घटनांमधील सुमारे ११जणांना वाचवण्यासाठी येथील स्थानिक व्यावसायिक सूरज पवार, विश्वास सांबरे, मिलींद माने यांना यश आले. (वार्ताहर)