शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

११ अर्ज अवैध

By admin | Updated: February 7, 2017 23:04 IST

अर्जांची छाननी; जि.प.चे ५, पं.स. चे ६ उमेदवार

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी दाखल करण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्रापैकी मंगळवारी करण्यात आलेल्या छाननीअंती ११ उमेदवारी अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत. यात जिल्हा परिषद गटातील ५ तर पंचायत समित्यांच्या गणातील ६ नामनिर्देशनपत्र अवैध झाली आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषद गटासाठी २२६ तर पंचायत समिती गणासाठी ४१६ नामनिर्देशनपत्र वैध ठरली आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ज्याठिकाणी अपिल नसेल त्या ठिकाणी १३ फेब्रुवारी तर ज्या ठिकाणी अपिल असेल अशा ठिकाणी १५ फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या १५० जागांसाठी किती उमेदवार निवडणूक आखाड्यात आहेत ते चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान प्राप्त झालेल्या उमेदवारी अर्जांमधील पात्र तसेच अपात्र उमेदवारी अर्जासोबत जिल्हा न्यायाधीशांकडे अपील दाखल करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी ६ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. या जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २३१ एवढे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. तर पंचायत समितीसाठीच्या १०० जागांसाठी ४२२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी या प्राप्त उमेदवारी अर्जांच्या छाननीची प्रक्रिया पार पडली. यात जिल्हा परिषदेच्या पाच उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात आले तर, पंचायत समितीमध्ये ६ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत.तालुकावार वैध व अवैध अर्जवैभववाडी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण १२ अर्जांपैकी १० वैध तर २ अवैध तसेच पंचायत समितीच्या एकूण २४ अर्जांपैकी २२ वैध तर २ अवैध अर्ज ठरले आहेत. कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी प्राप्त सर्व २९ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तर पंचायत समितीच्या एकूण प्राप्त ५३ अर्जांपैकी ५३ अर्ज वैध ठरले आहेत. देवगड तालुक्यातून एकूण प्राप्त २१ अर्जापैकी २१ अर्ज वैध ठरले आहेत. तर पंचायत समितीच्या एकूण ३८ प्राप्त अर्जांपैकी ३८ अर्ज वैध ठरले आहेत. मालवण तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या जागांसाठी एकूण प्राप्त ३४ अर्जांपैकी ३३ अर्ज वैध तर १ अर्ज अवैध ठरला आहे. तर पंचायत समितीच्या जागांसाठी प्राप्त ६४ अर्जांपैकी ६३ अर्ज वैध ठरले असून १ अर्ज अवैध ठरला आहे. कुडाळ तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या ५० प्राप्त अर्जापैकी ५० अर्ज वैध ठरले आहेत. तसेच पंचायत समितींच्या जागांसाठी ७५ पैकी ७५ अर्ज वैध ठरले आहेत. वेंगुर्ले तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या ३१ अर्जांपैकी २९ अर्ज वैध ठरले असून २ अर्ज अवैध ठरले आहेत. तर पंचायत समितीच्या जागांसाठी प्राप्त ५३ अर्जांमधून ५२ अर्ज वैध तर १ अर्ज अवैध ठरला आहे. सावंतवाडीतून जिल्हा परिषदेच्या जागांसाठी प्राप्त झालेले ३६ पैकी ३६ अर्ज वैध ठरले आहेत. तर पंचायत समितीच्या जागांसाठी प्राप्त ७४ अर्जातून ७३ अर्ज वैध ठरले असून १ अर्ज अवैध ठरला आहे. दोडामार्ग तालुक्यातून जिल्हा परिषदेच्या १८ प्राप्त अर्जापैकी १८ अर्ज वैध ठरले आहेत. तसेच पंचायत समितींच्या जागांसाठी प्राप्त झालेल्या एकूण ४१ अर्जातून ४० वैध तर १ अर्ज अवैध ठरला आहे. (प्रतिनिधी)