शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

खारेपाटण येथे १0 लाखांचे बिबट्याचे कातडे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 23:46 IST

कणकवली : कणकवली तालुक्यातील खारेपाटण पोलीस चेकपोस्ट येथे १० लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक ...

कणकवली : कणकवली तालुक्यातील खारेपाटण पोलीस चेकपोस्ट येथे १० लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि वनविभागाच्या पथकाने संयुक्तरीत्या ही कारवाई मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास केली. या प्रकरणी रत्नागिरी जिल्ह्यातील तवेरा गाडीसह तिघांना अटक करण्यात आले आहे.या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील नीलेश विवेक मांडवकर (वय २९, रा. राजापूर, कोदीवली), परीक्षित जितेंद्र मयेकर (२५, रा. दापोली) आणि गोपाळ गणपत गडवार (२९, राजापूर, हर्डी) यांचा समावेश आहे. तवेरा या चारचाकी गाडीतून राजापूर ते कणकवली अशी बिबट्याच्या कातड्याची वाहतूक केली जात होती. ही गाडी गोपाळ गडवार चालवत होता.बिबट्याच्या कातड्याची मोठी तस्करी सह्याद्रीच्या पट्ट्यात केली जाते. विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड व रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर या भागात कातडी खरेदी विक्रीचे मोठे व्यवहार होत असतात. अशाच एका व्यवहाराची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मंगळवारी मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक रविराज फडणीस आणि कणकवली वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनवडेकर यांच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी ४ वाजता खारेपाटण येथे सापळा रचला होता.या कारवाईच्या वेळी चार चाकी गाडीतून राजापूरहून तिघे संशयित बिबट्याचे कातडे घेऊन निघाले असल्याची माहिती वनक्षेत्रपालना देण्यात आली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने तसा सापळा रचून मुंबई गोवा महामार्गावरील खारेपाटण चेकपोस्ट येथे कारवाई केली. संशयित आरोपीना १० लाखांच्या कातड्यासह ताब्यात घेत तवेरा गाडी जप्त केली आहे. हे तिघे संशयित बिबट्याच्या कातडीचे तस्कर असावेत असा संशय आहे. त्यामुळे त्यादृष्टीनेही आता वनविभाग तपास करणार आहे. या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस नाईक संतोष सावंत, संकेत खाडये, रवी इंगळे, अमित तेली, जयेश सरमळकर यांच्यासह वनविभागाचे वनपाल साटम, बडदे, शेगावे आदी सहभागी झाले होते.कारवाईने सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ !अलीकडेच कणकवली तालुक्यातील हुंबरठ येथेही अशीच कारवाई करण्यात आली होती. तशीच कारवाई पुन्हा खारेपाटण येथे झाली आहे. या प्रकरणी ताब्यात घेतलेले तिघेजण रत्नागिरी जिल्ह्यातील असले तरी कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. वन्यप्राण्यांच्या कातडयाची तस्करी करणाऱ्यांचे धाबे या कारवाईमुळे दणाणले आहेत. या तिघांना आज, बुधवारी कणकवली येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.