सुखी लैंगिक जीवनासाठी तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासोबतच लैंगिक आरोग्यही चांगलं राहणं गरजेचं आहे. पण याच्यासोबच लाइफ पार्टनरप्रति तुमचा सपोर्ट असणंही तेवढंच गरजेचं आहे. अनेकदा छोट्या छोट्या चुकांमुळे लैंगिक जीवन खराब होतं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही चांगल्या सवयी सांगणार आहोत, ज्याने तुम्हाला तुमचं लैंगिक जीवन हेल्दी ठेवण्यासाठी मदत मिळेल.
एकमेकांची किंमत करा
जे कपल एकमेकांसोबत आनंदी असतात, ते लैंगिक जीवनातही खशू असतात किंवा याचं उलटं करूया. जर तुमचे इटंरेस्ट वेगवेगळे असतील तरी सुद्धा एकमेकांची किंमत करा. जेव्हा तुम्ही एकमेकांची पसंत-नापसंतला महत्त्व द्याल तेव्हाच तुमचं लैंगिक जीवनही अधिक चांगलं होईल.
एकमेकांशी कनेक्टेड
भलेही तुम्ही फार बिझी राहत असाल, पण हेल्दी लैंगिक जीवनासाठी एकमेकांशी कनेक्ट राहणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही एकमेकांशी कनेक्ट होऊ शकले नाही तर याचा तुमच्या लैंगिक जीवनावरही प्रभाव पडू शकतो. जे कपल एकमेकांना प्राथमिकता देता, ते बेडरूममध्येही एकमेकांशी कनेक्ट असतात.
किससाठी कारण कशाला हवं?
एकमेकांना किस करण्यासाठी कोणत्या कारणाची गरज का पडावी? किस करून तुम्ही त्यांना तुम्हाला वाटत असलेलं प्रेम व्यक्त करत असता. काळजी व्यक्त करत असता. गरजेचं नाही की, पार्टनरला केवळ शारीरिक संबंध ठेवतानाच किस करावं. सुखी लैंगिक जीवन असणारे लोक किस करण्यासाठी कारण शोधत नाहीत. ते किस करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. यातून तुम्ही पार्टनरप्रति असलेली काळजी दाखवू शकता.
आवडीनिवडी एक्सप्लोर करा
जे लोक लैंगिक जीवनात आनंदी असतात ते पार्टनरसोबत त्यांच्या इच्छा आणि आवडी एक्सप्लोर करतात. तुमच्या पार्टनरला काय हवंय? हे जाणून घेणं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तेव्हाच तुम्ही तुमचं लैंगिक जीवन अधिक चांगलं करू शकाल. पार्टनरच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला तुमच्या लैंगिक जीवनात फरक बघायला मिळेल.
कामे वाटून घ्या
एका रिसर्चमध्ये आढळलं की, जे लोक घरातील कामे वाटून घेतात आणि आपल्या पार्टनरला काम पूर्ण करण्यासाठी मदत करतात. त्यांचं लैंगिक जीवन आनंद असतं. याने तुम्ही तुमच्या पार्टनरला समान दर्जाची भावना देता आणि त्यांच्याप्रति तुम्हाला वाटणारी काळजीही यातून दिसून येते.