शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शारीरिक संबंधाची स्वप्ने का पडतात आणि याचा आरोग्यावर काय प्रभाव पडतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 15:42 IST

आजकाल प्रत्येक जोडप्याला लैंगिक जीवनाशी कोणती ना कोणती समस्या सतावत आहे. दिवसभराची धावपळ आणि करिअरचा तणाव त्यांच्या खासगी लाइफवर प्रभाव टाकत आहे.

(Image Credit : Bustle)

आजकाल प्रत्येक जोडप्याला लैंगिक जीवनाशी कोणती ना कोणती समस्या सतावत आहे. दिवसभराची धावपळ आणि करिअरचा तणाव त्यांच्या खासगी लाइफवर प्रभाव टाकत आहे. अशात काही जोडप्यांपैकी महिला आणि पुरुषांनी  सेक्स ड्रीम्सची तक्रार केली आहे. चला जाणून घेऊ का येतात सेक्स ड्रीम्स आणि याचा आरोग्यावर काय परिणाम होतो. 

काय आहे सेक्स ड्रीम्स?

सेक्स ड्रीम्स हे ती स्वप्ने असतात ज्यात आपण स्वत:ला कुणासोबत तरी संभोग करताना बघत असतो. पुरूष अनेकदा त्यांच्या स्वप्नांमध्ये स्त्री अंगांना बघतात, तर महिला सुद्धा त्यांच्या स्वप्नांमध्ये पुरूषांच्या अंगांबाबत तसाच विचार करतात. 

काय येतात सेक्स ड्रीम्स?

ही स्वप्ने सामान्यपणे अर्धवट इच्छा आणि अनपेक्षित विचारांना अभिव्यक्त करतात. ही स्वप्ने आपल्या उत्तेजनेचा भाग असतात. याची कारणे काहीही असू शकतात. असं लग्न जास्त अडचणी आहेत किंवा ऑफिसमध्ये काही टेन्शन आहे. सेक्स ड्रीम्स हे आपल्या भावना व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे. जर तुम्ही तुमचा मेंदू लैंगिक गोष्टींमध्ये व्यस्त ठेवून पुन्हा पुन्हा  हा विचार कराल की, तुम्हाला स्वप्नात काय बघायचं आहे, तर स्वप्नातही तुम्ही तसंच बघू शकता.

रिसर्च काय सांगतो?

सेक्स ड्रीम्सवर आता अनेक रिसर्च झाले आहेत. यातीलच एक २००७ मध्ये यूनिव्हर्सिटी ऑफ मॉन्ट्रियलचा रिसर्चही आहे. यात सहभागी पुरूष आणि महिलांपैकी जवळपास ८ टक्के असे होते, ज्यांना सेक्ससंबंधी स्वप्ने पाहिली होती. मानसोपचार तज्ज्ञ आणि सेक्सॉलॉजिस्ट सांगतात की, सेक्स ड्रीम्स झोपेची एक रॅपिड आय मुव्हमेंट(REM) अॅक्टिव्हिटी आहे. ही स्वप्ने येण्याची सर्वात जास्त शक्यता तेव्हा असते जेव्हा तुम्ही लैंगिक जीवनापासून वंचित असता. किंवा तुमच्या कामेच्छा दबलेल्या असतात. ही सुद्घा एक लैंगिक क्रियाच असून याने आनंद आणि संतुष्टी मिळते. 

अशा स्वप्नांनी तणाव होतो कमी

या स्वप्नांना आपल्या उत्तेजनेचा भाग मानला जातो. त्यामुळे अशी स्वप्ने पाहिल्यावर किंवा दिसल्यावर अप्रत्यक्षपणे स्ट्रेस आणि थकवा दूर होतो आणि आनंद मिळतो. म्हणजे यात वाईट किंवा गैर काही नाही. सेक्स ड्रीम्स तुमच्या जीवनातील दु:खाला खोलवर अर्थ देतात आणि याचा सेक्ससोबत काहीच देणंघेणं नाही. 

थेरपीसारखा करू शकता वापर

जर तुमची सेक्स लाइफ आनंदी नसेल तर तुम्ही सेक्स ड्रीम्सना थेरपीसारखं वापरू शकता. ज्या कपल्सना इंटिमसी समस्या असतात अशा कपल्सना तज्ज्ञ अशाप्रकारची स्वप्ने बघण्याचा सल्ला देतात. त्यांच्यानुसार, असं केल्याने कपल्स त्यांच्या पार्टनरवर फोकस करू शकतील आणि एकमेकांप्रति त्यांच्या भावनाही जागृत होतील. 

(टिप - वरील मुद्दे केवळ माहिती म्हणून आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातील कोणत्याही गोष्टीचा दावा आम्ही करत नाही. तुम्हाला लैंगिक जीवनाशी काहीही समस्या असेल तर वरील गोष्टीचा उपाय म्हणून वापर करू नका. काही समस्या असेल तर तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.) 

टॅग्स :Sex Lifeलैंगिक जीवनRelationship Tipsरिलेशनशिप