शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

झेडपी अध्यक्षांनी घेतला विद्यार्थ्यांचा तास

By admin | Updated: January 11, 2016 00:48 IST

अहिरे प्राथमिक शाळा : मुलांची बौद्धिक पातळी पाहून शिक्षकांच्या कामाचे कौतुक

खंडाळा : स्वच्छ व सुंदर परिसर, विविध रंगांच्या फुलांनी बहरलेली बाग, शालेय आनंददायी वातावरण, चुनचुनीत मुले अशी सर्वांग सुंदर शाळा पाहून जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांनी पहिली ते चौथीच्या वर्गावर जाऊन विद्यार्थ्यांचा तास घेतला. शाळेती विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी पाहून शिक्षकांच्या कामकाजाबाबत कौतुक केले.अहिरे येथील प्राथमिक शाळेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी अचानक भेट दिली. सोबत सभापती रमेश धायुगडे-पाटील, सरपंच सुरेखा धायगुडे, अ‍ॅड. सचिन धायगुडे होते. अध्यक्षांनी सर्वप्रथम पहिली ते चौथीच्या वर्गात जाऊन विविध विषयांस अनुसरून तपासणी केली. विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य, गणितीक्रिया, इंग्रजी वाचन, कला-कार्यानुभवाची प्रात्यक्षिके पाहिले. तब्बल तीन तास विद्यार्थ्यांशी हितगुज केले.सोनवलकर यांनी शाळेची पाहणी करुन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. अचानक भेट देऊनही शाळा आणि विद्यार्थ्यांची तयार पाहून जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी समाधान व्यक्त केले.अहिरे शाळेने परिसरात बागेची निर्मिती करून विविध प्रकारच्या फुलझाडांची लागवड केली आहे. मुलांसाठी खेळाचे प्रशस्त मैदान, मनोरंजक खेळणीची उभारणी यांचीही पाहणी केली. शाळेच्या आयएसओ मानांकनासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांनी शाळा व्यवस्थापनाला दिले. त्यामुळे शिक्षकांनी समाधान व्यक्त केलेल. (प्रतिनिधी)अहिरे शाळेचा कायापालट करण्याचे काम गतीने सुरू आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांचे कायम प्रयत्न असतात. शाळेचे अनेक उपक्रम हाती घेऊन सर्वांगीण शिक्षण देण्यात येते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी भेट घेऊन कौतुक केले. यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले आहे. यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील यांनीही भेट देऊन पाहणी केली होती. जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी लक्ष देत असल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह वाढ आहे. - प्रशांत गंधाले,मुख्याध्यापक, अहिरे प्राथमिक शाळा