शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचा डंका : सातारचे ‘मिशन धाराऊ’ महाराष्ट्रात पोहोचणार

By नितीन काळेल | Updated: February 8, 2024 21:21 IST

आदिती तटकरे यांच्याबरोबर बैठक; अधिकाऱ्यांना सूचना

सातारा: जन्मानंतर एक तासाच्या आत बाळाला स्तनपानाचे प्रमाण वाढविणे, बाळाच्या सहा महिन्यांनंतर दोन वर्षांपर्यंत स्तनपानाबरोबरच वरच्या आहाराचे प्रमाण वाढविण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने ‘मिशन धाराऊ माता दुग्धामृतम्’ अभियान सुरू केले होते. या अभियानाचे यश पाहून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हे अभियान राज्यात राबविण्याबाबत सूचना केली आहे. यामुळे जिल्हा परिषदेचा डंका वाजणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेने नावीन्यपूर्ण उपक्रम म्हणून ‘मिशन धाराऊ’ हे अभियान २०२१ मध्ये सुरू केले होते. यामधून जिल्ह्यात स्तनपान आणि शिशुपोषण विषयाची सामाजिक लोकचळवळ निर्माण करण्याचा उद्देश होता; कारण, बालकाच्या शारीरिक विकासात स्तनपानाची भूमिका मोलाची असते. परंतु, आजही समाजात याबाबत गैरसमजुती आणि कुप्रथा पाळल्या जातात. याचा परिणाम नंतर बालकांच्या वाढीवर होतो. यासाठी मार्गदर्शनाची गरज भासते. अशा प्रकारचे मार्गदर्शन सहज आणि सोप्या पद्धतीने होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ‘मिशन धाराऊ-माता दुग्धामृतम’ अभियान सुरू आहे. या अभियानाचा खूप चांगला फायदा झाला. तसेच उद्देशही सफल झाला आहे. त्यामुळे राज्यात हे अभियान राबविण्याचे नियोजित करण्यात आले आहे.

मुंबईत मंत्रालयात याबाबत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बैठक घेतली. या बैठकीला सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे उपस्थित होत्या. यावेळी मंत्री तटकरे यांनी ‘मिशन धाराऊ’ तसेच अभियानाच्या यशाबद्दल माहिती घेतली. त्यानंतर या अभियानाचा उद्देश पाहून संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच याबाबत त्यांनी संबंधितांना सूचनाही केली आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या वतीने ‘मिशन धाराऊ’ अभियान राबविण्यात येत आहे. याचा फायदा गर्भवती महिला तसेच स्तनदा मातांना झालेला आहे. या अभियानाचा उद्देश सफल होऊन यशही मिळाले. त्यामुळे ही योजना आता राज्यात राबविली जाणार आहे, याचा आनंद होत आहे.- रोहिणी ढवळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारीसातारा जिल्हा परिषदेने ‘मिशन धाराऊ’ हे अभियान सुरू केले आहे. यामधून जिल्ह्यात स्तनपान आणि शिशुपोषण विषयाची चळवळ निर्माण करण्याचा उद्देश होता. या अभियानाचा खूप चांगला फायदा झाला. तसेच उद्देशही सफल झाला आहे. त्यामुळे राज्यात हे अभियान राबविण्याचे नियोजित करण्यात आल्याने सातारा जिल्ह्याचा नावलाैकिक आणखी वाढला आहे.- याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी

टॅग्स :satara-pcसाताराAditi Tatkareअदिती तटकरे