शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पुरुषांना संधी!

By admin | Updated: November 18, 2016 23:24 IST

नेतेमंडळींमध्ये चैतन्य

सातारा : जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण महिला राखीवऐवजी खुले झाल्याने जिल्ह्यातील अनेक मातब्बरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. वर्षानुवर्षे गट मजबूत ठेवण्यासाठी जिवाचे रान करणाऱ्या राजकीय मंडळींना आता अध्यक्षपदाची संधी खुणावू लागली आहे. सलग दहा वर्षे आलेले महिला आरक्षण बदलण्याचा निर्णय शुक्रवारी मुंबईत झाला. या निर्णयात सातारा जिल्हा परिषदेचाही समावेश झाला. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद महिला राखीव झाले होते; परंतु ते बदलून खुले झाले. या आरक्षण बदलामुळे खुल्या प्रवर्गातील नेतेमंडळींमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आता कुणाचे नाव पुढे येईल, याचीही चर्चा या आरक्षण सोडतीनंतर जिल्हाभर सुरू झाली. विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे बंधू जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना यानिमित्ताने संधी उपलब्ध झाली आहे. त्यांच्या नावाची चर्चाही फलटण तालुक्यात जोरदार रंगू लागली आहे. फलटण तालुक्यातील तरडगाव, हिंगणगाव किंवा गिरवी हे गट खुले असल्याने यापैकी कुठल्याही गटातून संजीवराजे निवडणूक लढवू शकतात. माजी खासदार लक्ष्मणराव पाटील व आमदार मकरंद पाटील यांचे निकटवर्ती तसेच खंडाळा पंचायत समितीचे सभापती नितीन भरगुडे-पाटील यांनाही आता अध्यक्षपदी संधी मिळू शकते, अशी चर्चा वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तालुक्यांमध्ये सुरू झाली आहे. त्यांचा शिरवळ गटही खुला असल्याने भरगुडे-पाटलांचे नाव जोरदार चर्चेत आले आहे. त्यांनी याआधी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद सांभाळले आहे. शेंद्रे गटातून खासदार उदयनराजे भोसले यांचे निकटवर्ती व जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ समिती सभापती सुनील काटकर यांच्याही नावाची चर्चा सातारा तालुक्यात सुरू झाली. कऱ्हाड तालुक्यातील मसूर गट खुला असल्याने राष्ट्रवादीचे नेते मानसिंगराव जगदाळे यांचे नाव यानिमित्ताने या तालुक्यात जोरदार चर्चेत आले आहे. या गटांतील विजयी उमेदवारांना संधी खंडाळा तालुक्यातील शिरवळ, खेड बुद्रुक, जावळी तालुक्यातील कुडाळ, म्हसवे, सातारा तालुक्यातील शेंद्रे, वर्णे, फलटण तालुक्यातील तरडगाव, हिंगणगाव, गिरवी, कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक, ल्हासुर्णे, वाठार किरोली, पाटण तालुक्यातील मल्हारपेठ, म्हावशी, मंद्रुळकोळे, कऱ्हाड तालुक्यातील मसूर, कोपर्डे हवेली, तांबवे, येळगाव, विंग तसेच माण तालुक्यातील आंधळी या जिल्हा परिषद गटातील निवडून येणारे उमेदवार अध्यक्षपदासाठी दावेदार राहतील.