शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

‘झिरो’ बनला वसूलदार नंबर वन: ऐकावं ते नवलच :तर काय करेल ‘वर्दी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 00:09 IST

कºहाड : खाकीतले पोलिस खरे ‘हिरो’; पण सध्या कºहाडात सिव्हिल ड्रेसवर ‘झिरो’ पोलिस चक्क ‘हिरोगिरी’ करतायत. चारचौघांत कॉलर टाईट करून ऐट मारतायत.

ठळक मुद्देवार्धक्याकडे झुकलेल्या या झिरो पोलिसाला दादा, अप्पा म्हणून पोलिस हाक मारत असतातमॅडमना मदत करण्याच्या नावाखाली वाहने अडवायची आपोआपच त्याचा रुबाब तयार होतो. अशांना ‘झिरो पोलिस’ म्हटले जाते.

संजय पाटील ।कºहाड : खाकीतले पोलिस खरे ‘हिरो’; पण सध्या कºहाडात सिव्हिल ड्रेसवर ‘झिरो’ पोलिस चक्क ‘हिरोगिरी’ करतायत. चारचौघांत कॉलर टाईट करून ऐट मारतायत. एवढच नव्हे तर ठराविक ट्रॅफिकवाल्यांच्या छायेत त्यांचा वावरही वाढलाय. ट्रॅफिकवाले कुरवाळत असल्याने रस्त्यावर उभं राहून वाहनं अडविण्यापर्यंत मजल गेलीय.

कºहाडची वाहतूक शाखा म्हणजे ‘आधे इधर, आधे उधर’चा ‘ड्रामा’. शाखेत तब्बल चाळीस कर्मचारी काम करतात; पण बºयाचवेळा ‘पॉर्इंट’वर नेमण्यासाठी कर्मचारी शोधण्याची वेळ येते. काहीजण सुटीवर तर काहीजण रजेवर गेल्यास शाखेच्या अधिकाºयांना कर्मचारी आणि पॉर्इंटचा ताळमेळ घालत कसरत करावी लागते. त्यातच काही कर्मचाºयांची हुशारी अधिकाºयांसाठी डोकेदुखी ठरत असल्याची परिस्थिती आहे. वास्तविक, या शाखेचे अधिकारी सरळमार्गी. वाळल्या पाचोळ्यावर पाय पडला तर दिलगिरी दाखविणारे. काम भलं अन् आपण, असा त्यांचा शिरस्ता; पण अधिकाºयाच्या या मवाळ धोरणानेच काही कर्मचारी सुस्तावलेत. ‘ड्युटी’वर असतानाही ते झिरो पोलिसाला कामाला लावून स्वत: पावत्यांमध्ये व्यस्त असतात. ‘झिरो’ पोलिसाने वाहने आडवायची आणि साहेबांनी अथवा मॅडमनी पावती करायची, असा नवा पायंडा हे कर्मचारी पाडतायत. याबरोबरच ‘बुलेट’वाल्या आणि ‘पाटील’की करणाºया कर्मचाºयांची संख्याही वाढताना दिसतेय.

झिरो पोलिस हे पात्र कºहाडकरांसाठी नवीनच. यापूर्वी असा स्वयंघोषित पोलिस असतो, हेच जनतेला माहिती नव्हतं. मात्र, सध्या वेगवेगळ्या कारणानं ‘झिरो पोलिस’ हे नाव प्रत्येकाच्या कानी पडतय. त्यामुळे ट्रॅफिकवाल्यांसोबत फिरणाºयांकडे अनेकांची नजर वळलीय. वाहतूक शाखेतल्या काही ‘खास’ कर्मचाºयांसोबत सध्या असे ‘झिरो पोलिस’ फिरतायत. वारंवार पोलिस ठाण्यात वावरणे, अधिकारी तसेच कर्मचाºयांसोबत राहणे, गर्दीच्या ठिकाणी विनाकारण फौजदारकी करणे, सर्वांसमोर अधिकारी व कर्मचाºयांना फोन लावून रुबाब झाडणे असे प्रकार त्यांच्याकडून सुरू आहेत. कुणावर निव्वळ कारवाई करायची, कुणाला दंड करायचा आणि कुणावर खटला भरायचा? हे ‘झिरो पोलिसा’च्या इशाºयावर होत असल्याचे वडापवाले सांगतायत.‘अप्पा’से डर लगता है साहबकºहाड शहरासह तालुक्यातील वडापवाले एकवेळ ट्रॅफिक हवालदाराला घाबरणार नाहीत; पण ‘अप्पा’पासून चार हात लांब राहतात. पूर्वी एकाच अप्पाची वडापवाल्यांसोबत उठबस असायची. तोच पोलिस आणि वडापवाल्यांमध्ये मध्यस्थी करतानाही दिसायचा. मात्र, सध्या आणखी एका अप्पाची ‘एन्ट्री’ झालीय. या दोन अप्पांची सध्या वडापवाल्यांमध्ये चांगलीच चर्चा आहे. ‘झिरो पोलिस’ म्हणून हे ‘अप्पा’ ट्रॅफिकवाल्यांसोबत फुशारक्या मारताना दिसतायत. एवढेच नव्हे तर एक अप्पा रस्त्यावर उभं राहून काहीवेळा वाहनही अडवतो. आणि ट्रॅफिकवाल्या मॅडम त्याचं समर्थन करतात, हे विशेष.‘हे’ वेगळे, आणि ‘ते’ वेगळे!कºहाड शहर पोलिस ठाण्यात ‘माऊली’ आणि ‘महाराज’ यांचाही वावर आहे. मात्र, या दोघांकडून पोलिसांना मदतच होते. हे दोघेही प्रामाणिकपणे पोलिसांसोबत सेवा करतात; पण फक्त ट्रॅफिकवाल्यांशी जवळीक साधून खिसे गरम करण्याचा काहींचा उद्योग आहे. वडापवाल्यांवर खुन्नस ठेवायची, जवळच्या ट्रॅफिकवाल्याला ‘टीप’ देऊन त्याच्यावर कारवाई करायला लावायची, मॅडमना मदत करण्याच्या नावाखाली वाहने अडवायची आणि त्यातून ‘झिरो पोलिस’ असल्याची ऐट मारायची, असा त्यांचा एककलमी कारभार सुरू आहे.‘झिरो पोलिस’ म्हणजे काय?छापा कारवाईसह अन्य कारणास्तव पोलिसांना वारंवार पंच, साक्षीदारांची गरज भासते. ऐनवेळी असे पंच आणि साक्षीदार उभे करताना पोलिसांची धावपळ होते. त्यामुळे ठराविक काहीजणांशी पोलिस कायम संपर्कात असतात. तसेच संबंधित व्यक्तीही कायम पोलिस अधिकारी किंवा कर्मचाºयांसोबत वावरते. अशा व्यक्तींचा अनेकवेळा पोलिसांना फायदाही होतो. संबंधिताला कसलेही अधिकार नसले तरी पोलिसांसोबत वावर असल्यामुळे आपोआपच त्याचा रुबाब तयार होतो. अशांना ‘झिरो पोलिस’ म्हटले जाते.झिरो पोलिसाचा पद्धतशीरपणे वापरसातारा : शहर पोलिस ठाण्यामध्येही एका झिरो पोलिसाच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाण केली जाते. जनता आणि पोलिसांमधील वसुलीचा दुवा असणाºया या झिरो पोलिसाचा पोलिस पद्धतशीरपणे वापर करून घेतात. सातारा शहर पोलिस ठाण्यामध्ये एक झिरो पोलिस कार्यरत आहे. एका शाखेमध्ये म्हणे तीन झिरो पोलिस आहेत. या पोलिसांचे काम केवळ वसुलीच असते. खबºया कमी वसुलीच जास्त, अशी अवस्था असणाºया या झिरो पोलिसांचा रुबाबही खºयाखुºया पोलिसांसारखाच असतो. जी सर, जयहिंद, हे शब्द त्याच्या तोंडावर सराईतपणे येत असतात. शहर पोलिस ठाण्यात असलेला झिरो पोलिसही असाच आहे. वार्धक्याकडे झुकलेल्या या झिरो पोलिसाला दादा, अप्पा म्हणून पोलिस हाक मारत असतात. अधिकाºयांची घरगुती कामे करण्यापासून ते वसुली करण्यापर्यंत सगळी कामे हा झिरो पोलिस करत असतो. एका शाखेत म्हणे तीन झिरो पोलिस आहेत. मात्र, हे पोलिस शाखेत फारसे नसतात. फोनवरून कामे करण्यात हे अप्पा, दादा म्हणे पटाईत आहेत. त्यामुळे या शाखेत येणाºया प्रत्येक प्रकरणाची गोपनीयता राखली जाते.

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे