शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

वाईच्या प्राध्यापकाने पुण्यात विकसित केला ऑक्सिजन प्लांट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : वैद्यकीय कारणांसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढावा यासाठी ऑक्सिजन तयार करणारी सयंत्रे परदेशातून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : वैद्यकीय कारणांसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढावा यासाठी ऑक्सिजन तयार करणारी सयंत्रे परदेशातून मागवावी लागत आहेत. याचीच दखल घेत एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे प्रा. डॉ. राजेश जाधव यांनी प्रायोगिक तत्त्वावर वातावरणातील घटक एकत्र करून ‘स्प्रेशर स्विंग अ‍ॅबसॉर्प्शन’ तंत्रज्ञानाचा वापर करून ऑक्सिजन तयार करणारे सयंत्र विकसित केले आहे.

वाई तालुक्यातील परखंदी हे प्रा. डॉ. राजेश जाधव यांचे मूळगाव. अनंत इंग्लिश स्कूल येथे माध्यमिक आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात गरवारे महाविद्यालयातून पदव्युत्तर पदवी संपादन केली. त्यानंतर ते एमआयटी डीटी विद्यापीठात कार्यरत झाले. ऑक्सिजन प्लांटविषयी प्रा. डॉ. राजेश जाधव म्हणाले, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करून आम्ही या ऑक्सिजन प्लांटची निर्मिती केली आहे. यात आवश्यकतेनुसार ऑक्सिजनचे उत्पादन वाढविता अथवा कमी करता येणार आहे. तसेच यात वायुसंवेदन आणि पीएलसी तंत्रावर आधारित अलार्म सिस्टम बसविण्यात आले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोना रुग्णांच्या आणि त्यांना लागणाऱ्या ऑक्सिजनची कमी पूर्ण करण्यासाठी या प्लांटचा लाभ होणार आहे. वैद्यकीय वापरासाठी ९३ टक्के ऑक्सिजनची घनता मिळणार आहे.

हवेत आधीच प्राणवायू अर्थात ऑक्सिजन असताना पुन्हा तो शोषून नव्याने प्राणवायू कसा तयार केला जातो, याचे कुतूहल असणे स्वाभाविक आहे. वातावरणातील हवा शोषून, पी.एस.ए. तंत्राचा वापर करून रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा करताना, सर्वप्रथम संयत्रांमध्ये योग्य दाबाने हवा संकलित केली जाते. त्यानंतर ती हवा शुद्ध (फिल्टर) करण्यात येते. त्यामुळे हवेतील अशुद्ध घटक जसे की, धूळ, तेल, इंधन यांचे अतिसूक्ष्म कण, इतर अयोग्य घटक गाळून वेगळे केले जातात. या प्रक्रियेनंतर उपलब्ध झालेली शुद्ध हवा ‘ऑक्सिजन’ जनरेटरमध्ये संकलित केली जाते. जनरेटरमध्ये असलेल्या झिओलिट या रसायनयुक्त मिश्रणाद्वारे या शुद्ध हवेतून नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन्ही वायू वेगळे केले जातात. वेगळा करण्यात आलेला ऑक्सिजन अर्थात प्राणवायू हा योग्य दाबासह स्वतंत्रपणे साठवला जातो. तेथून तो पाईपद्वारे रुग्णांपर्यंत पोहोचवला जातो, असे डॉ. राजेश जाधव यांनी सांगितले. या यशाबद्दल प्रा. डॉ. राजेश जाधव यांचे अभिनंदन केले.

चौकट :

प्रेशर स्विंग अ‍ॅबसॉर्प्शन तंत्रज्ञानाचा वापर

‘प्रेशर स्विंग अ‍ॅबसॉर्प्शन’ तंत्रज्ञानाचा वापर करून हा ऑक्सिजन प्लांट तयार केला आहे. ऑक्सिजन सिलिंडरच्या मागणीनुसार आपल्याला यामध्ये आवश्यक ते बदल करता येतात. ऑक्सिजन मिळविण्याच्या क्रायोजेनिक पद्धतीपेक्षा स्प्रेशर स्विंग अ‍ॅबसॉर्प्शन हे तंत्रज्ञान स्वस्त व सुरक्षित आहे. शैक्षणिक संस्था आणि उद्योगांच्या परस्पर सहकार्यातून नवतंत्रज्ञान विकसित करणे ही काळाजी गरज असल्याचे प्रा. डॉ. जाधव सांगतात.