शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

प्रेमासाठी काय पण! प्रेम सिद्ध करण्यासाठी प्रियकरानं घेतलं विष

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2019 21:52 IST

प्रेयसी विष घे म्हणाल्यानं प्रियकर विष प्यायला 

सातारा : आपले प्रेम दाखवण्यासाठी एका प्रियकराने विष प्राशन केल्याची घटना साताऱ्यात घडली. या प्रियकरावर सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती सध्या नाजूक आहे. प्रेयसी विष घे म्हणून हे पाऊल उचलल्याची माहिती त्यानं पोलिसांना जबानीत दिली. आज दुपारी ही घटना घडली. साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीत राहणारा प्रियकर २८ वर्षांचा आहे. तो एका गाडीवर चालक म्हणून काम करतो. रविवारी दुपारी त्याने सिव्हिल हॉस्पिटलसमोरील रस्त्यावर सुरूवातीला तीन बाटल्या बिअर प्यायला. त्यानंतर त्याने त्याच्या प्रेयसीला फोन केला. ‘मी तुझ्यावर किती प्रेम करतो, हे पाहायचे असेल तर मी कीटकनाशक पिऊ का,’ असे तिला विचारले. प्रेयसीनेही तत्काळ होकार दिला. त्यानंतर तो राऊंडअप हे तणनाशक प्यायला. घडलेला प्रकार सिव्हिल हॉस्पिटलसमोर असलेल्या काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्रियकराला उपचारासाठी दाखल केले. या घटनेची माहिती त्याच्या प्रेयसीलाही मिळाली. त्यानंतर त्याची प्रेयसी अन्य मैत्रिणींना घेऊन सिव्हिलमध्ये दाखल झाली. ‘माझी प्रेयसी विष घे,’ असे म्हणाल्याने मी विष घेतले असल्याचा जबाब प्रियकराने  जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांना दिला. प्रियकराची प्रकृती सध्या नाजूक आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.