शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पसरणी घाटात नमदाम्पत्यावर हल्ला; पतीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 20:11 IST

आनंद आणि दिक्षाने प्रेमविवाह केला होता. या कारणामुळे तर हा प्रकार घडला नाही ना, यादृष्टीनेही पोलीस शोध घेत आहेत.

सातारा : अवघ्या आठ दिवसांपूर्वी लग्न करून महाबळेश्वर, पाचगणीला फिरण्यासाठी आलेल्या औंध, पुणे येथील युवकाचा पसरणी घाटात खून करण्यात आला. प्राथमिकदृष्ट्या हल्लेखोरांनी चोरीचा बनाव करून घातपात केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. आनंद ज्ञानदेव कांबळे (वय २६) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. आनंद आणि त्याची पत्नी दिक्षा गेल्या दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी आले होते. शनिवारी दुपारी पसरणी घाटातून पुण्याकडे निघाले होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांना अडविले. पत्नीच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याचा बहाणा करतच हल्लेखोरांनी आनंदच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. त्यात आनंद गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. पत्नी दिक्षा जखमी असून तिला मानसिक धक्का बसला आहे. त्यामुळे ती बोलण्याच्या मन:स्थितीत नाही. ती शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना घटनास्थळावरील वृत्तांत समजणार आहे. दरम्यान, आनंद आणि दिक्षाने प्रेमविवाह केला होता. या कारणामुळे तर हा प्रकार घडला नाही ना, यादृष्टीनेही पोलीस शोध घेत आहेत.

टॅग्स :MurderखूनCrimeगुन्हा