शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

प्रेमास नकार दिल्याने तोंडावर अ‍ॅसिड टाकण्याची युवतीला धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 13:14 IST

प्रेमास नकार दिल्याने महाविद्यालयीन युवतीला तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देण्याचा प्रकार साताऱ्यात घडला असून, याप्रकरणी एका युवकाला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.

ठळक मुद्देप्रेमास नकार दिल्याने तोंडावर अ‍ॅसिड टाकण्याची युवतीला धमकी तरुणाला अटक; पोलिसांकडून तत्काळ दखल

सातारा : प्रेमास नकार दिल्याने महाविद्यालयीन युवतीला तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देण्याचा प्रकार साताऱ्यात घडला असून, याप्रकरणी एका युवकाला सातारा शहर पोलिसांनी अटक केली आहे.विक्रम बाळकृष्ण निपाणे (रा. महादरे, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित २७ वर्षीय युवती साताऱ्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.

गत दहा वर्षांपासून विक्रम निपाणे हा संबंधित युवतीचा पाठलाग करत होता. तू मला खूप आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे, अशी तो युवतीला गळ घालत होता.

मात्र संबंधित युवतीने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या निपाणे याने तू जर माझ्यासोबत लग्न केले नाहीस तर बघ मी काय करतो. तुझ्या तोंडावर अ‍ॅसिड टाकतो व बघतो, तुझ्याबरोबर कोण लग्न करतो ते, अशी त्याने संबंधित युवतीला धमकी दिली.

या प्रकारानंतर घाबरलेल्या युवतीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी संशयित विक्रम निपाणे याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर