शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
2
कोट्यवधीचे दागिने, पोर्श, BMW सारख्या १० लग्झरी कार अन् रोकड...: ED च्या धाडीत सापडला 'खजिना'
3
Priya Marathe Passes Away: लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी
4
Nagpur Crime: ...अन् गर्लफ्रेंडच्या हत्येसाठी त्याने ऑनलाईन मागवला चाकू, एंजेलच्या हत्येपूर्वी काय काय घडलं?
5
निक्की मृत्यू प्रकरण: पेनड्राइव्ह अन् डॉक्टरच्या जबाबामुळे विपिनची फॅमिली सेफ; पुन्हा नवीन वळण
6
रिलायन्ससह टॉप १० पैकी ८ कंपन्यांचे २.२५ लाख कोटी रुपये बुडाले; फक्त 'या' २ कंपन्यांनीच कमावला मोठा नफा
7
Ratnagiri Crime: 'मैत्रिणीकडे चाललेय'; रत्नागिरीच्या भक्तीला प्रियकरानेच संपवलं, दुर्वास पाटील कसा अडकला?
8
Amit Shah: मुंबईकरांना बदल हवा, कामाला लागा; अमित शाहांचा भाजप नेत्यांना कानमंत्र!
9
भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होणार; RBI गव्हर्नर मल्होत्रांचा मोठा दावा, कुणाला दिलं श्रेय?
10
एअर इंडियाच्या विमानाचे आपात्कालीन 'लँडिंग'; हवेत असतानाच इंजिनला लागली आग, प्रवासी सुखरूप
11
टॅरिफ वॉरदरम्यान PM मोदी आणि जिनपिंग यांची भेट; चीनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले,'एकत्र येणे महत्त्वाचे'
12
फक्त १ लाख रुपये जमा करून मिळवा १४,३२५ रुपये निश्चित व्याज! कॅनरा बँकेने आणखी खास FD योजना
13
'त्या' महिला पोलीस निरीक्षकाची बदली मॅटकडून रद्द
14
"आमच्या मालिकेवेळी तिला पुन्हा कॅन्सर...", प्रिया मराठेच्या निधनानंतर सुबोध भावेची भावुक पोस्ट
15
रोहित शर्माची झाली फिटनेस टेस्ट; ऑस्ट्रेलियाविरूद्ध वनडे मालिकेत खेळणार की नाही? जाणून घ्या
16
वर्दळीच्या सायन-पनवेल महामार्गावरील खाडीपुलावर गाड्यांची लांबचलांब रांग!
17
जि.प.च्या शाळेने सुरू केली सायकल बँक; कष्टकऱ्यांच्या लेकरांची थांबली पायपीट!
18
"माझा प्रॉब्लेम आहे, मंगळसूत्र चोरांच्या विरोधात मी लढत नाही"; जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं
19
Maharashtra Rains: महाराष्ट्रात पावसाचा कहर, तुमच्या जिल्ह्यात किती टक्के बरसला? जाणून घ्या आकडा
20
नंदुरबारमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा नदीतून जीवघेणा प्रवास

जवान विनोद गायकवाड अनंतात विलीन

By admin | Updated: January 3, 2017 23:23 IST

मान्यवरांनी वाहिली आदरांजली : सुपने येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

तांबवे : पश्चिम सुपने, ता. कऱ्हाड येथील जवान विनोद गायकवाड यांच्यावर मंगळवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीजवळील गुरगावच्या मानेसर परिसरात रविवारी त्यांचा अपघात झाला होता. त्यामध्ये जखमी झाल्यानंतर उपचार सुरू असताना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.पश्चिम सुपने येथील विनोद गायकवाड हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सेवेमध्ये होते. सध्या त्यांची दिल्ली येथे एनएसजीच्या विशेष कमांडो पथकात नेमणूक होती. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी विनोद यांचा धाकटा भाऊ विशाल याचा विवाह समारंभ होता. या विवाहासाठी विनोद गावी आले होते. समारंभ आटोपल्यानंतर आठच दिवसांपूर्वी ते पुन्हा सेवेत रूजू झाले. रविवार, दि. १ रोजी सकाळी विनोद यांचा दुचाकीवर अपघात झाला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले. उपचारार्थ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव मंगळवारी त्यांच्या गावी पश्चिम सुपने येथे दुपारी बाराच्या सुमारास सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांमार्फत आणण्यात आले. ट्रॅक्टरमधून त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात येत होते. त्यावेळी विठ्ठल गणोजी माने विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसह आबालवृद्धांनी रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून फुलांचा वर्षाव करत ‘विनोद गायकवाड अमर रहे’ अशा घोषणा दिल्या. त्या घोषणांनी सारा परिसर शोकाकुल झाला. प्रकाश पाटील, प्रदीप पाटील, महेंद्र पाटील, साहेबराव गायकवाड, उपसरपंच प्रवीण थोरात, शंकरराव थोरात यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर लष्करी जवान आणि पोलिस दलाच्या वतीने बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. (वार्ताहर)कुटुंबीयांच्या आक्रोशाने पानावले डोळे...पार्थिव घरामध्ये आणल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांसह नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. तेथून पुन्हा पार्थिव स्मशानभूमीत नेण्यात आले. पार्थिवास आमदार शंभूराज देसाई, तहसीलदार राजेंद्र्र शेळके, तालुका पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, अ‍ॅड. उदयसिंह पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, सारंग पाटील, सीआयएसएफचे जवान, कमांडो, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे अधिकारी, सैन्य दलासह पोलिस दलातील अधिकारी, ग्रामस्थांनी पुष्पचक्र अर्पण केले.