शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना झाल्याच्या भीतीने तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 18:02 IST

CoronaVirus Karad Satara : गेले वर्षभर लोकांच्या मनात कोरोनाची धास्ती अधिकाधिक वाढत आहे. सध्या राज्यभरात कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत असल्याने कोरोना झाल्याच्या भीतीने मानसिक संतुलन बिघडल्यामुळे वडगाव हवेली (ता. कऱ्हाड) येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देकोरोना झाल्याच्या भीतीने तरुणाची आत्महत्या वडगाव हवेली येथील घटना

वडगाव हवेली/कऱ्हाड : गेले वर्षभर लोकांच्या मनात कोरोनाची धास्ती अधिकाधिक वाढत आहे. सध्या राज्यभरात कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत असल्याने कोरोना झाल्याच्या भीतीने मानसिक संतुलन बिघडल्यामुळे वडगाव हवेली (ता. कऱ्हाड) येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील अनिल उत्तम चलवादे (वय ४५ ) हे काही वर्षांपासून वडगाव हवेली येथील स्टॅन्ड परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होते. याच परिसरात ते बांधकाम मजूर म्हणून काम करत होते. काही दिवसांपासून किरकोळ स्वरूपात आजारी असल्याने यांनी कोविड १९ बाबत असणारी टेस्ट काल दि. २२ रोजी वडगाव हवेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करून घेतली होती. मात्र रिपोर्ट आला नव्हता.टेस्ट घेतल्यापासून ते, आपणास कोरोना झाला असेल या भीतीपोटी अस्वस्थ होते. यातूनच त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे रात्रभर ते विचारात असल्याची जाणीव घरातील सदस्यांना झाली होती. मात्र सकाळी सात वाजता घरातील लोक आपापल्या दैनंदिन जीवनात व्यस्त असतानाच, त्यांनी राहत्या घरात ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य काळजी घेऊन पंचनामा करण्यात आला. घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात झाली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCrime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर