शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

माण-खटावमधील वाऱ्याची दिशा तुम्हाला पंधरा वर्षांत समजली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:26 IST

म्हसवड : ‘गेल्या पंधरा वर्षांत जंग जंग पछाडूनही तुम्हाला माण-खटावमधील वाऱ्याची दिशा समजली नाही. तुम्ही माणमध्ये आला तेव्हा ...

म्हसवड : ‘गेल्या पंधरा वर्षांत जंग जंग पछाडूनही तुम्हाला माण-खटावमधील वाऱ्याची दिशा समजली नाही. तुम्ही माणमध्ये आला तेव्हा तुमचा पक्ष आणि बगलबच्चे निवडणुका हरल्याचा इतिहास तुमच्या नावे झाला आहे. तुमचे अतिक्रमण येथील स्वाभिमानी जनतेने नेहमीच हाणून पाडले आहे. पालकमंत्री, विधान परिषदेच्या सभापतिपदाची आयुधे घेऊन आजपर्यंत माणमध्ये आलात. ही राजकीय आयुधे बाजूला ठेवून मैदानात यायचे धाडस दाखवा,’ असे आव्हान आमदार जयकुमार गोरे यांनी दिले.

माण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामराजे यांच्या उपस्थितीत नुकतीच संवादसभा झाली. त्या वेळी रामराजेंनी ‘माणमधील वाऱ्याचा अंदाज घ्यायला आलोय, कार्यकर्त्यांना मान खाली घालावी लागेल अशी तडजोड होणार नाही,’ अशी वक्तव्ये केली होती. या पार्श्वभूमीवर आमदार जयकुमार गोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन समाचार घेतला.

आमदार गोरे म्हणाले, ‘मी राजकारणात आल्यापासून रामराजेंना माणमधील वाऱ्याची दिशा समजली नाही. ते येथे आले तेव्हा राष्ट्रवादी निवडणुकांत पराभूत झाली. आपण माण-खटावमध्ये बिन बुलाये मेहमान असता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते येण्याने नाखूष असतात. जबरदस्तीने त्यांच्यावर नेतृत्व लादायच्या भानगडीत पडू नका. रामराजे यांना निवडणुकीपुरताच माण-खटाव आठवतो. चौदा महिन्यांपासून येथील जनता कोरोना महामारीला धैर्याने तोंड देत आहे. अनेकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने अनेक संसार उघड्यावर पडले.’

आमदार गोरे म्हणाले, ‘लोकांना उपचारासाठी बेड मिळत नव्हते, तेव्हा तुम्ही कोणते होकायंत्र शोधत होता. ‘आमचं ठरलंयवाले’ त्या काळात दडी मारून बसले होते. राष्ट्रवादीच्या आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांना गरज होती तेव्हा आम्हीच बेड उपलब्ध करून दिले आहेत. राजकीय कटकारस्थाने करायला तुम्ही माणमध्ये अवश्य या, त्यासाठी स्वागतच आहे, मात्र इथली जबाबदारी घ्यायचे पुण्यकर्म कधीच केले नाही. एकतर तुम्हाला कुणीही मनापासून विचारत नाही. येथे आग लावून कंड्या पिकवण्याचे उद्योग करता असे तुमचेच पदाधिकारी खासगीत बोलतात. तुम्ही पालकमंत्री, विधान परिषदेचे सभापतिपद अशी आयुधे घेऊन इथे आलात आणि आमच्याशी लढलात. एकदा ही सगळी आयुधे बाजूला ठेवून मैदानात उतरावे.’