शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

येळगावकरांनी काढली राष्ट्रवादीची लायकी!

By admin | Updated: August 8, 2014 00:41 IST

पाणीप्रश्न : केवळ टँकर लॉबी जपण्यासाठी दुष्काळग्रस्तांना झुलवल्याचा आरोप

सातारा : ‘राष्ट्रवादीला जिहे-कठापूर पाणी योजना पूर्ण करायचीच नव्हती. माण-खटाव मधला दुष्काळ कायम ठेवून त्यांना केवळ टँकर लॉबी जोपासायची होती. गेल्या १७ वर्षांत सत्ता असतानाही ही योजना पूर्णत्वास गेली नाही, त्यामुळे राष्ट्रवादीची लायकी काय?, हे चांगलेच कळाले,’ अशी खरमरीत टीका माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी केली. डॉ. येळगावकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर गुरुवारी (दि.७) प्रथमच साताऱ्यात जाहीरपणे पत्रकार परिषद घेतली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. भरत पाटील, जिल्हा परिषदेचे खटाव येथील माजी सदस्य महेश शिंदे, रवींद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ‘दुष्काळी भाग जलसिंचनाखाली आणू, असे आश्वासन देण्यात आल्याने आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. अडीच वर्षे या पक्षात राहिलो; मात्र आपली पूर्ण निराशा झाली,’ असे डॉ. येळगावकर यांनी सांगितले. डॉ. येळगावकर म्हणाले, ‘जिल्ह्याच्या वाट्याचं पाणी बाहेरील जिल्ह्यात पळवताना नियम बासनात गुंडाळले आहेत. माण, खटाव व कोरेगावला पाणी देताना जलसंपदा विभागाचे अधिकारी नियमावर बोट ठेवतात. मात्र, सांगोल्याला बिनदिक्कतपणे पाणी दिले जाते. १९९६ साली युती शासनाने जिहे-कठापूर योजनेला मंजुरी दिली. १९९७ नंतर आजअखेर तब्बल १७ वर्षे राष्ट्रवादी व काँगे्रस यांच्या आघाडीची सत्ता असून, देखील अवघ्या सहा किलोमीटर अंतरात जलवाहिनी टाकण्यासाठी भूसंपादन करता आलेले नाही. हे काम पूर्ण झाले असते तर नेर, येरळा, येरळवाडी धरण, आंधळी धरण व देवापूरचे धरण पाण्याने भरले गेले असते. यातून परिसरातील दुष्काळ मिटला असता, टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरजही लागली नसती. मात्र, राष्ट्रवादीला टँकर लॉबी जोपासायची आहे. (प्रतिनिधी)तालुकानिहाय अनुशेष भरावा, असा माझा आग्रह होता. मात्र, शरद पवारांनी महामंडळाचं भूत दुष्काळग्रस्तांच्या मानगुटीवर बसवलं. दुष्काळग्रस्तांचं राष्ट्रवादीला काही देणं-घेणं नाही, हे लक्षात आल्यावर मी लाथ मारून बाहेर पडलो आहे. लुंग्या-सुंग्यांनी माझ्यावर आरोप करू नयेत. कुठल्याही मंत्र्यानं पाणीप्रश्नावर बोलायला माझ्यासमोर स्टेजवर यावं, असेही जाहीर आव्हान डॉ. येळगावकर यांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना दिले. ११ रोजी येळगावकरांचे पक्षांतरडॉ. दिलीप येळगावकर, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश शिंदे यांच्यासह काँगे्रस व राष्ट्रवादीतील अनेक नेतेमंडळी व कार्यकर्ते दि. ११ रोजी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. या प्रवेशासाठी सातारा, खटाव व कोळे, ता. कऱ्हाड येथे मेळावे आयोजित केले आहेत, अशी माहिती अ‍ॅड. भरत पाटील यांनी दिली. तालुकानिहाय अनुशेष भरावा, असा माझा आग्रह होता. मात्र, शरद पवारांनी महामंडळाचं भूत दुष्काळग्रस्तांच्या मानगुटीवर बसवलं. दुष्काळग्रस्तांचं राष्ट्रवादीला काही देणं-घेणं नाही, हे लक्षात आल्यावर मी लाथ मारून बाहेर पडलो आहे. लुंग्या-सुंग्यांनी माझ्यावर आरोप करू नयेत. कुठल्याही मंत्र्यानं पाणीप्रश्नावर बोलायला माझ्यासमोर स्टेजवर यावं, असेही जाहीर आव्हान डॉ. येळगावकर यांनी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना दिले. ११ रोजी येळगावकरांचे पक्षांतरडॉ. दिलीप येळगावकर, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश शिंदे यांच्यासह काँगे्रस व राष्ट्रवादीतील अनेक नेतेमंडळी व कार्यकर्ते दि. ११ रोजी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत. या प्रवेशासाठी सातारा, खटाव व कोळे, ता. कऱ्हाड येथे मेळावे आयोजित केले आहेत, अशी माहिती अ‍ॅड. भरत पाटील यांनी दिली.