शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

यवतेश्वरच्या रहदारीचा भार ब्रिटिशकालीन भिंतीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 23:14 IST

जावेद खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहराच्या पश्चिमेला निसर्ग सौंदर्याने नटलेला कास पठार आहे. या ठिकाणी निसर्ग न्याहळण्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून पर्यटक येत असतात. तसेच शहराला ऐतिहासिक वारसाही लाभला आहे. अनेक ठिकाणी इतिहासाची आठवण करून देणाºया वास्तूही पाहायला मिळतात.ऐन पावसाळ्यात यवतेश्वर घाटातील रस्ता खचल्याने हा मार्ग रहदारीसाठी तात्पुरता बंद करण्यात ...

जावेद खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहराच्या पश्चिमेला निसर्ग सौंदर्याने नटलेला कास पठार आहे. या ठिकाणी निसर्ग न्याहळण्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून पर्यटक येत असतात. तसेच शहराला ऐतिहासिक वारसाही लाभला आहे. अनेक ठिकाणी इतिहासाची आठवण करून देणाºया वास्तूही पाहायला मिळतात.ऐन पावसाळ्यात यवतेश्वर घाटातील रस्ता खचल्याने हा मार्ग रहदारीसाठी तात्पुरता बंद करण्यात आला होता. दरम्यान, कास पठारावर फुलांचा हंगाम सुरू असतानाच पावसाच्या पाण्याने रस्ता खचला गेला. जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आल्याने परराज्यातून येणाºया पर्यटकांचा हिरमोड झाला. कास पठाराला जाण्याचा मुख्य निम्मा रस्ता खचला तरी बाकीचा रस्ता रहदारी करण्यास धोका नव्हता, याचेच कारण म्हणजे या ठिकाणी असलेली ब्रिटिशकालीन दगडी भिंत. या दगडी भिंतीमुळे उर्वरित रस्ता शाबूत राहिला असून, लहान वाहनांसाठी वाहतूक सुरूच ठेवली.यवतेश्वर मार्गावरील पावसाच्या पाण्याने हा रस्ता खचला होता. पाच मीटर रुंदीचा हा रस्ता जवळपास दीड मीटरने खचल्याने राहिलेल्या साडेतीन मीटर रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक होते; परंतु याच ठिकाणी ब्रिटिशकालीन दगड-मातीची दहा ते पंधरा फूट खोल भिंत असल्याने उर्वरित रस्ता व्यवस्थित राहिलाआहे. त्यामुळे संबंधित विभागाने खचलेल्या रस्त्याची पाहणी करून एकेरी वाहतूक सुरुवात करण्यात आली. सध्या येथे भराव टाकण्याचे काम सुरू आहे. येथे काम करणारे कामगार व कर्मचारी अधिकारी वर्गानही ब्रिटिशकालीन भिंतीमुळेच हा रस्ता राहिला असून, सध्या येथून होणाºया रहदारीलादेखील कोणताच धोका नसल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.ऐन हंगामात पर्यटकांची पायपीट..ज्यावेळी हा रस्ता खचला, त्यावेळी खबरदारी म्हणून संपूर्ण रस्ता रहदारीसाठी बंद करण्यात आला होता. यावेळी परराज्यातून आलेल्या पर्यटकांना पायपीट करून कास पठाराचे दर्शन घ्यावे लागत होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर या ठिकाणी पाहणी केली असता निम्मा रस्ता सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आल्याने एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. पावसाच्या पाण्याने चिखल वाहून गेल्याने याठिकाणी ब्रिटिशकालीन भिंत असल्याने हा रस्ता वाहतुकीला कोणताच धोका नसल्याचे संबंधित विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.