औंध : औंध येथील श्री यमाईदेवी यात्रेनिमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती व औंध ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात आलेल्या जनावरांच्या प्रदर्शनामध्ये ‘श्री यमाई यात्रा चॅम्पियन’ चा किताब फडतरवाडीच्या उत्तम फडतरे यांच्या खोंडाने पटकविला. प्रदर्शनाचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासक पी. के. काळे, बबनराव कदम, उपसरपंच राजेंद्र माने, राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस हणमंत शिंदे, दीपक नलवडे, वसंतराव गोसावी, अलिम मोदी, प्रभारी सचिव नामदेव देशमुख, निरीक्षक अशोक पवार, पर्यवेक्षक सुमंत सर्वगोड, सांख्यिकी अधिकारी जितेंद चव्हाण आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.जनावरांच्या प्रदर्शनातील अन्य विजेते गटानुसार याप्रमाणे - आदत गाय एक वर्षांचे आत पहिले तीन क्रमांक नारायण जाधव जायगाव, बाबासो लकडे, नांदोशी, कालिदास जाधव जायगाव, आदत गाय एक वर्षांचे वरील पहिले तीन क्रमांक अनुक्रमे- अक्षय फडतरे लांडेवाडी, मिलिंद कदम गोरेगाव वांगी, मोहन गोडसे महूद, संभाजी कदम गोरेगाव.दोन दाती गाय - धनराज देशमुख कुरोली, देवदास गायकवाड नांदोशी, अरुण इंगळे औंध यांनी पहिले तीन क्रमांक पटकाविले. चार दाती गाय - पहिले तीन क्रमांक अनुक्रमे मोहसीन मुलाणी बुध, संदीप इंगळे औंध, युवराज गायकवाड आर्वी. जुळीक गाय - पहिले तीन क्रमांक स्वप्नील फडतरे बुध, शहाजी घार्गे येळीव, श्रीरंग भोसले खातगुण, बाळू मदने. आदत खोंड - (वर्षाचे वरील) पहिले तीन क्रमांक प्रभाकर फडतरे, शेखर पवार, शांताराम कुंभार, औंध. दोन दाती खोंड - पहिले तीन क्रमांक उत्तम फडतरे फडतरवाडी, शब्बीर मुलाणी बुध, भरत पवार वांझोळी, संभाजी येवले त्रिमली, नेताजी माने वरुड, अशोक सूर्यवंशी लांडेवाडी.चारदाती खोंड - पहिले तीन क्रमांक रामचंद्र इंगळे औंध, बाबू इंगळे औंध, मनोज चव्हाण पुसेसावळी, जुळीक खोंड - महादेव शिंदे कान्हरवाडी, अक्षय गिरी सातारा यांनी विजेतेपद पटकाविले.जनावरांच्या प्रदर्शनामध्ये एकूण १०० जनावरांनी सहभाग घेतला.परीक्षण पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. यु. डी. मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सावंत आदींच्या पथकाने परिश्रम घेतले. नामदेव देशमुख यांनी आभार मानले. (वार्ताहर)े
फडतरेंचे खोंड ठरले ‘यमाई चॅम्पियन’
By admin | Updated: January 16, 2015 23:47 IST