शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

नवीन पुस्तक खरेदीपेक्षा झेरॉक्स बरी!

By admin | Updated: January 7, 2015 23:31 IST

स्वस्ताईत ग्राहक आकर्षित : पुस्तकांचा खप घटला

परळी : सातारा शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विविध पुस्तकांच्या झेरॉक्स काढून त्यांची विक्री होत असल्यामुळे पुस्तकांच्या खपात प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे प्रकाशकांमध्ये खळबळ उडाली आहे. दुसरीकडे मात्र काही झेरॉक्स सेंटर चालकांची चांदी होत आहे. बहुतांशी प्रकाशने कोल्हापूर, पुणे येथील असल्यामुळे कारवाईची शक्यता धुसर आहे.इंजिनिअरिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. इंजिनिअरिंगच्या पुस्तकांची किंमतही चारशे ते सहाशे रुपयांच्या घरात आहे. सर्वत्र विद्यार्थ्यांना महागडी पुस्तके खरेदी करणे शक्य होत नाही. काहींना शक्य असले तरी ही पुस्तके स्वस्तात उपलब्ध होत असल्यामुळे त्यांची बेकायदेशीर झेरॉक्स प्रत खरेदी करण्याकडे विद्यार्थ्यांचा कला वाढला आहे. काही विद्यार्थी, पालकांकडून पुस्तकांच्या किमतीनुसार पैसे वसूल करतात. प्रत्यक्षात मात्र झेरॉक्ससंच वापरून त्यातून शिल्लक राहिलेल्या पैशाची चैनीसाठी वापरत असल्याचेही उघड झाले आहे. मात्र, ज्या-ज्या ठिकाणी इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेजच्या ठिकाणी झेरॉक्सचा व्यवसाय जोमात आहे. (वार्ताहर)स्पायरला पुस्तकांना मागणीविद्यार्थ्यांना प्रोजेक्ट सादर करावे लागत असल्यामुळे झेरॉक्स सेंटरमध्ये संगणकप्रणालीही अपडेट करण्यात आली आहे. या प्रणालीचा वापर करून बहुतांशी पुस्तकांच्या पीडीएफ फाईल्स तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आवश्यक त्या पुस्तकांच्या झेरॉक्स प्रती काढून त्या स्पायरल बायडिंग करून पुरवल्या जातात. त्यामुळे नवीन पुस्तके खरेदी करण्यापेक्षा स्पायरल पुस्तके विद्यार्थी अधिक वापरत आहेत. यातूनच झेरॉक्स सेंटरवाल्यांची कमाई जास्त होत आहे.