शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

कोरेगावच्या मदतीला जागतिक बँक धावली

By admin | Updated: June 5, 2015 00:14 IST

30 कोटींच्या आराखड्यास मंजूरी : नव्या पाणी योजनेसह घनकचरा निर्मूलन व सांडपाणी प्रकल्पासाठी निधीची तरतूद

कोरेगाव : कोरेगाव शहराला पुढील २५ वर्षातील लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेऊन नव्या पाणी योजनेसह घनकचरा निर्मूलन व सांडपाणी प्रकल्पासाठी सुमारे ३० कोटी रुपयांच्या सुधारीत आराखड्यास मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती नगर विकास कृती समितीचे संघटक राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे व संतोष नलावडे यांनी दिली.शहरातील अपुरा पाणी पुरवठा, कचऱ्याचे साम्राज्य आणि सांडपाणी समस्या सोडविण्यासाठी नगर विकास कृती समितीने जलसंपदा मंत्री असताना आ. शशिकांत शिंदे यांना आॅगस्ट २०१४ मध्ये एक निवेदन सादर केले होते. कृती समितीने तीळगंगा नदी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून केलेल्या कामाची माहिती देत या कामाला भासणारी निधीची कमतरता व पुढील २५ वर्षात वाढणाऱ्या समस्यांचा एक अहवाल आ. शिंदे यांना दिला होता, त्यानुसार आ. शिंदे यांनी तातडीने जलसंपदा विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करुन कोरेगावसाठी नवीन पाणी योजना उभारता येईल काय याबाबत सूचना दिल्या होत्या.त्याच दरम्यान जलस्वराज्य प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रस्ताव मागणीला काही दिवस उरलेले होते. नगर विकास कृती समितीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर ६ सप्टेंबर २०१४ रोजी आ. शिंदे यांच्या शिफारसीने जलस्वराज्य प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कोरेगावचा समावेश होण्यासाठी समितीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता जिल्हा परिषदेकडे केली होती. याकामी अधिकारी कोळी, प्रकल्प प्रमुख पी. डी. भोसले, राजेंद्र बर्गे यांनी तातडीने प्रस्ताव तयार करुन त्यास मंजुरी मिळवली. नव्या ४.५ दशलक्ष लिटर क्षमतेच्या या पाणी योजनेमध्ये नव्या उपसा विहीरीसह जलवाहिन्या, पंपगृह, उच्च अश्वशक्तीची पंप मशिनरी, दाबनलीका, २.५ दशलक्ष लिटर क्षमेतेचे पाणी शुध्दीकरण केंद्र, रेल्वेस्टेशन परिसर, जुन्या गावठाण परिसर व दत्त नगर या तीन ठिकाणी उंच पाणी साठवण टाक्या व अत्याधुनिक वितरण व्यवस्थेसाठी सुमारे ११. ४३ कोटी रुपयांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. या नव्या योजनेमुळे प्रतीमाणसी १३५ लिटर पाणी उपलब्ध होणार असून या संपूर्ण प्रकल्पासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे.तीन्ही नव्या प्रकल्पांची माहिती देण्यासाठी बुधवारी ग्रामपंचायतीच्या सभागृहात सरपंच विद्या येवले, उपसरपंच मंदा बर्गे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी प्रायमो इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे अधिकारी राहुल कुंभार, जलस्वराज्य प्रकल्पाचे अधिकारी पी. डी. भोसले, राजेंद्र बर्गे यांनी प्रकल्पाची माहिती दिली. (प्रतिनिधी)अत्याधुनिक घनकचरा निर्मुलन प्रकल्प लवकरचसंपूर्ण शहरात भुयारी गटर योजना कार्यान्वित करुन सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पही उभारण्यात येणार असून शहरातील सर्व सांडपाणी तीळगंगा नदी पात्रास मिसळत असते, त्या पाण्यावर सहा ठिकाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, तर शहराला मोठ्या प्रमाणात भेडसावणाऱ्या कचरा समस्येवर मात करण्यासाठी अत्याधुनिक घनकचरा निमूर्लन प्रकल्प उभारण्यात येणार असून सुमारे अडीच एकर जागेत होणाऱ्या या प्रकल्पामुळे कचऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी १८.८९ कोटींचा खर्च अपेक्षीत असून या प्रकल्पासाठीही जागतिक बँकेचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे.