शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सातारा पालिका : थकीत वेतनासाठी काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 19:44 IST

गेल्या पाच महिन्यांपासून वेतन अदा न झाल्याने पालिकेत ठेकेदारी तत्त्वावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जवळपास पन्नास महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याने शहरात काही ठिकाणी स्वच्छतेचे काम होऊ शकले नाही.

ठळक मुद्देथकीत वेतनासाठी काम बंद आंदोलनउपाययोजना करण्याचीप्रशासनाकडे मागणी

सातारा : गेल्या पाच महिन्यांपासून वेतन अदा न झाल्याने पालिकेत ठेकेदारी तत्त्वावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांनी शनिवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जवळपास पन्नास महिलांनी या आंदोलनात सहभाग घेतल्याने शहरात काही ठिकाणी स्वच्छतेचे काम होऊ शकले नाही.पालिकेच्या आरोग्य विभागात सुमारे दीडशे महिला कर्मचारी या ठेकेदारी पद्धतीने काम करतात. गेल्या पाच महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना ठेकेदाराकडून त्यांचे वेतन अदा झालेले नाही. वेतनाची संपूर्ण जबाबदारी ठेकेदाराची आहे; परंतु त्यांच्याकडून इतका विलंब का केला जातोय? याबाबत कोणाला कसलीच कल्पना नाही.सध्या कोरोनामुळे उद्योग, व्यवसाय बंद असल्याने अनेकांची आर्थिक घडी विस्कटली आहे. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांचे वेतन न मिळाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार मागणी करूनही वेतन मिळत असल्याने या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष गणेश दुबळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनही केले होते. यावेळी जोपर्यंत वेतन अदा होत नाही तोपर्यंत काम बंद करण्याचा निर्णय महिला कर्मचाऱ्यांनी घेतला होता. त्यानुसार शनिवारी सुमारे ५० महिलांनी काम बंद आंदोलनात सहभाग घेतला.या आंदोलनामुळे शहरात काही ठिकाणी स्वच्छतेचे काम होऊ शकले नाही. सेवेत कायम असलेल्या आरोग्य विभागातील कर्मचार्‍यांकडून स्वच्छता करण्यात आली. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पालिकेची यंत्रणा गेल्या चार महिन्यांपासून अहोरात्र झटत आहे. शहरासह उपनगरांचा भारही पालिकेवर आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे आंदोलन अनेक समस्या निर्माण करू शकते. त्यामुळे पालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराशी चर्चा करून हा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाSatara areaसातारा परिसर