शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
4
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
5
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
6
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
7
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
8
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
9
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
10
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
11
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
12
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
13
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
14
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
15
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
16
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
17
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
18
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
19
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
20
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली

रहिमतपूरचा पंधरा वायरमनांवर ३७ जणांच्या कामाचा लोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 22:54 IST

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रहिमतपूर उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या पंधरा वायरमनांवर अतिरिक्त ३७ वायरमनच्या कामाचा लोड लादण्यात आला आहे.

ठळक मुद्देउपविभाग कार्यालयातील प्रकार : उपकार्यकारी अभियंत्यांसह कनिष्ठ अभियंत्यांचे पदही रिक्त

रहिमतपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या रहिमतपूर उपविभागीय कार्यालयात कार्यरत असलेल्या पंधरा वायरमनांवर अतिरिक्त ३७ वायरमनच्या कामाचा लोड लादण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित वायरमन तणावाखाली कामकाज करत आहेत. दरम्यान, उपविभागाचे प्रमुख असलेले उपकार्यकारी अभियंत्यांसह कनिष्ठ अभियंत्यांचे पदही सुमारे वर्षभरापासून रिक्त आहे. त्यामुळे अतिरिक्त कामकाज पाहणारे कर्मचारीही ‘हाय होल्टेज’ तणावाखाली आहेत.

वीज वितरणच्या रहिमतपूर उपविभाग कार्यालयांतर्गत परिसरातील सुमारे ४१ गावांत कामकाज चालते. घरगुती वीज कनेक्शन, शेतीपंप वीज कनेक्शन यासह आदी विविध काम दररोज नियमितपणे सुरू असतात. याबरोबरच पावसामुळे, अपघातामुळे तसेच काही कारणामुळे नादुरुस्त झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम कर्मचारी करत असतात. रहिमतपूर शहरासह परिसरातील ४१ गावांतील वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी वायरमन तांत्रिक कर्मचारी यांची संख्या पुरेशी असणे गरजेचे असते. मात्र अत्यंत अल्प कर्मचाऱ्यांच्या बळावर सध्या हे कामकाज सुरू आहे.

रहिमतपूर शहर परिसरासाठी १७ वायरमनची पदे मंजूर आहेत. मात्र सध्या केवळ ४ वायरमन उपलब्ध असून, १७ पदे रिक्त आहेत. रहिमतपूर ग्रामीण परिसरासाठी १३ वायरमनची पदे मंजूर आहेत. मात्र ५ वायरमन उपलब्ध असून, ८ पदे रिक्त आहेत. वाठार किरोली परिसरासाठी वायरमनची ११ पदे मंजूर असून, केवळ २ वायरमन उपलब्ध आहेत. या ठिकाणी ९ पदे रिक्त आहेत. तारगाव परिसरासाठी वायरमनची ११ पदे मंजूर आहेत. मात्र ४ वायरमन उपलब्ध असून, ७ पदे रिक्त आहेत.उपविभागात उपलब्ध असलेल्या पंधरा वायरमनच्या अंगावर ३७ वायरमनच्या कामाचा लोड दिला आहे. अतिरिक्त कामाच्या लोडमुळे कर्मचारी मानसिक तणावाखाली काम करत आहेत.

अनेकदा अपुºया कर्मचाºयांच्या संख्येमुळे ज्या ठिकाणी दोन कर्मचाºयांची गरज आहे. त्या ठिकाणी धोका पत्करून एकच कर्मचारी काम करताना दिसत आहे. दोनच दिवसांपूर्वी सचिन फाळके नावाचे वायरमन यांचा शॉक लागून मृत्यू झाला. विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करताना कर्मचाºयाचा जीव वाचला असता. अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून वीज वितरणच्या अधिकाºयांनी तातडीने रिक्त जागा भराव्यात, अशी मागणी कर्मचाºयांसह नागरिकांतून होत आहे.रिक्त जागा भरणे गरजेचे ....रहिमतपूर उपविभाग कार्यालयाचे प्रमुख असलेले उपकार्यकारी अभियंता पद गेल्या सात महिन्यांपासून रिक्त आहे. सहायक अभियंता यांच्याकडे उपकार्यकारी अभियंता म्हणून अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना दोन टेबलची कामे करावी लागत आहेत. कनिष्ठ अभियंत्यांना त्यांच्या कामासह रहिमतपूर ग्रामीण शाखेचे पूर्ण कामकाज पाहावे लागत आहे. हे पद सप्टेंबर २०१६ पासून रिक्त आहे. तसेच वाठार किरोली येथील गुण नियंत्रण कक्षाची जबाबदारी कनिष्ठ अभियंत्यांवर देण्यात आली आहे. त्यांनाही अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे. जिल्हा कार्यालयाकडे या रिक्त जागा तत्काळ भरण्यात याव्यात, अशी अनेकदा मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmahavitaranमहावितरण