शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

साताऱ्यात महिलांची 'सावित्री बाईक रॅली', सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजन 

By सचिन काकडे | Updated: January 3, 2023 18:59 IST

स्वच्छतेचा आणि महिला सबलीकरणाचा देण्यात आला संदेश

सातारा : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंतीनिमित्त सातारा शहरात मंगळवारी सावित्री बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत एकूण ८० महिला दुचाकीस्वारांनी सहभाग नोंदविला. सातारा पालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या रॅलीचे आयोजन करण्यात आले.साताऱ्यातील गांधी मैदान येथून या रॅलीला प्रारंभ झाला. ही रॅली खालच्या रस्ता, पोवई नाका, राजपथ रस्त्यावरून पुन्हा गांधी मैदान अशी नेण्यात आली. लेखाधिकारी आरती नांगरे यांनी सावित्री रॅलीला हिरवा झेंडा दाखविला. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने सुकन्या योजनेअंतर्गत पालिका शाळांमधील मुलींचे टपाल कार्यालयात खाते उघडण्यात आले. स्वच्छतेचा आणि महिला सबलीकरणाचा संदेश देणाऱ्या या रॅलीमध्ये अडीचशे महिला सहभागी झाल्या.मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे नियोजन करण्यात आले.यावेळी आरोग्य निरीक्षक प्रकाश राठोड, सागर बडेकर, भांडार विभागाचे देविदास चव्हाण, बांधकाम अभियंता सुधीर चव्हाण याशिवाय सातारा शहरस्तर संघाच्या आशा मुळीक, सुवर्णा कडळ, कोमल माळी, उषा कुडाळकर, रूपाली गाढवे, मयूरी राजेशिर्के, भाग्यश्री पवार, स्वाती इंगवले, अर्चना जाधव यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. ही रॅली यशस्वी करण्यासाठी कीर्ती साळुंखे, गीतांजली यादव व आरती जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSavitri Bai Phuleसावित्रीबाई फुलेWomenमहिला