शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम कामगारांचा साताऱ्यात मोर्चा महिलांचाही सहभाग : घर बांधण्यासाठी अनुदानाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 00:48 IST

सातारा : बांधकाम व्यवसायात काम करणाºया कामगारांना हक्काचे घर बांधण्यासाठी ५ लाख रुपये द्यावेत, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ...

सातारा : बांधकाम व्यवसायात काम करणाºया कामगारांना हक्काचे घर बांधण्यासाठी ५ लाख रुपये द्यावेत, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी सातारा जिल्हा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेच्यावतीने सोमवारी साताºयात मोर्चा काढण्यात आला.

कामगारांना हक्काच्या घरासाठी ५ लाख रुपये द्यावेत, वयाच्या ५५ व्या वर्षांनंतर निवृत्तीवेतन ५ हजार रुपये द्यावेत, ज्यांना साहित्य खरेदीचे रुपये ५ हजार मिळाले नाहीत, ते द्यावेत, विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती द्यावी, बांधकाम कामगारांना मोफत आरोग्य सुविधा द्यावी, मंडळाचे ओळखपत्र द्यावे, मंडळासाठी सेस रक्कम मोठ्या प्रमाणात वसूल करून कामगार कल्याण मंडळात आर्थिक भर घालावी, नोंदणीदरम्यान अडाणी व अज्ञानी गरीब कामगारांशी अवमानास्पद वर्तणूक करू नये, पाणी व वाळू कमी पडल्याने बांधकाम असल्यास त्या दिवसात बांधकाम कामगारांना अडीचशे रुपये बेरोजगार भत्ता द्यावा किंवा ३५ किलो रेशन देण्यात यावे.

बांधकाम कामगारांनी केलेल्या कामाची थकीत रक्कम अनेकवेळा घरमालक, कॉन्ट्रॅक्टर, बिल्डर किंवा इंजिनिअर बुडवितात, ती बुडीत रक्कम वसूल करण्यासाठी सहायक कामगार आयुक्ताने हस्तक्षेप करून रक्कम वसूल करून द्यावी व संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, बांधकाम कामगार कल्याण मंडळासाठी स्वतंत्र पूर्ण वेळ कर्मचाºयाची नियुक्ती करावी आदी मागण्या केल्या आहेत.

माणिक अवघडे, शिवाजी कचरे, अमर राजे, निवास यमगर, संतोष करणे, भानुदास माळी, विजय जाधव, बसू शेट्टी, शांताराम कारंडे, महादेव सुतार, सचिन शेळके, धनाजी चव्हाण, सखाराम नवले, आयाज आत्तार, उद्धव क्षीरसागर, नितीन आवळे, आनंदी अवघडे, सोमनाथ बोडरे, दादासो पाटील, नीलेश खुडे, अंकुश फरांदे, विजय माने, मधुकर कदम,रामचंद्र अवघडे उपस्थित होते.विकास ठप्प; कामगार कल्याण मंडळ स्थापनसहायक कामगार आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, देशपातळीवर कामगारांच्या विविध मागण्यांसाठी होत असलेल्या संपात कामगार सहभागी झाले आहेत. बांधकाम कामगारांसाठी कामगार कल्याण मंडळ झाले; पण कामगारांचा विकास झाला नाही.सातारा येथे सातारा जिल्हा बांधकाम व्यवसाय कामगार संघटनेतर्फे सोमवारी मोर्चा काढण्यात आला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरStrikeसंप