शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

कऱ्हाडात महिलेचा खून

By admin | Updated: June 15, 2014 00:15 IST

अज्ञाताविरुद्ध गुन्हा : अंगणात झोपेत असताना डोक्यात प्रहार

कऱ्हाड : घरासमोरील अंगणात झोपलेल्या महिलेच्या डोक्यात अवजड शस्त्राने प्रहार करून तिचा खून करण्यात आला़ शहरातील कृष्णा नाका परिसरातील शिखरे वस्तीत शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली़ माया जगन्नाथ जगताप (वय ४५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे़शहरातील कृष्णा नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या शिखरे वस्तीत अभिजित अरविंद अष्टेकर यांची जागा आहे़ या जागेत खोली बांधून माया जगताप यांच्यासह त्यांची विवाहित मुलगी अमृता कांबळे, जावई बाळू श्रीपती कांबळे व नातू राज हे तिघेजण राहण्यास आहेत़ माया जगताप या कृष्णा नाक्यावरील एका चायनीज सेंटरवर भांडी धुण्याचे काम करीत होत्या़ त्यांची मुलगी अमृता व जावई बाळू हे दोघेजण जागामालक अभिजित अष्टेकर यांच्या वीटभट्टीवर मजूर म्हणून कामास आहेत़ शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे माया जगताप या कामावरून घरी आल्या़ मुलगी, जावई व नातवासोबत त्यांनी जेवण केले़ रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्या घरासमोरील अंगणात झोपण्यास गेल्या़, तर मुलगी अमृता, जावई बाळू व नातू राज हे तिघेजण घरामध्येच झोपले़ माया जगताप या घरात चोरी होण्याच्या भीतीने दररोज झोपताना घराच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावत असत़ तसेच कुलपाची चावी तेथेच लपवून ठेवत़ शुक्रवारी रात्रीही त्यांनी घराला बाहेरून कुलूप लावले़ त्यानंतर त्या झोपण्यासाठी गेल्या़ शनिवारी सकाळी अमृत यांनी आईला हाक मारून दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र, बराचवेळ बाहेरून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही़ अमृता यांच्या हाका ऐकून शेजारीच राहणाऱ्या रेणुका कांबळे व वंदना सर्वगौड या दोन महिला त्याठिकाणी आल्या़ त्यावेळी माया यांच्या डोक्यातून रक्त येत असल्याचे रेणुका यांना दिसले. शेजाऱ्यांनी दरवाजाचे कुलूप तोडल्यानंतर अमृता व बाळू यांना घराबाहेर आले़ अमृता कांबळे यांनी याबाबतची माहिती पोलिसांत दिली़ (प्रतिनिधी)