शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मनुस्मृतीचे दहन करून साताऱ्यात स्त्रीमुक्ती दिन साजरा

By दीपक देशमुख | Updated: December 25, 2023 17:14 IST

सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर, १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन केले होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातारा येथील ...

सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर, १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन केले होते. या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ सातारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकात सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले. तसेच मनुस्मृती दहन हाच स्त्रीमुक्ती दिन म्हणूनही साजरा करण्यात आला. यावेळी वंचितच्या जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई, जिल्हा उपाध्यक्षा चित्रा गायकवाड, शहराध्यक्षा माया कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.चित्रा गायकवाड म्हणाल्या, देशातील सर्व जातींच्या महिलांना माणूस म्हणून जगण्याचा व समानतेचा हक्क डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवून दिला. मनुस्मृती दहन हा दिवस खऱ्या अर्थाने स्त्रीमुक्ती दिवस आहे. या दिवशीच स्त्रियांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे.शहराध्यक्षा मायाताई कांबळे म्हणाल्या, मनुस्मृती ग्रंथाने छत्रपती शिवाजी महाराजांचाही राज्याभिषेक नाकारला होता. माणसाला माणूस म्हणून हीन वागणूक देणाऱ्या या ग्रंथाचे दहन डॉ.आंबेडकरांनी करून आपल्याला न्याय हक्क मिळवून दिला.यावेळी जिल्हा युवा महासचिव सायली भोसले, बुद्धिष्ट इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या प्रतीक्षा कांबळे, समाधान कांबळे, प्रमोद क्षीरसागर आदींनी स्त्रीमुक्तीबाबत सविस्तर माहिती कथन केली. शहराध्यक्ष मिलिंद कांबळे यांनी प्रास्ताविक केले. गौरव भंडारे यांनी आभार मानले. प्रारंभी बाबासाहेब यांच्या पुतळ्यास जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास शहर उपाध्यक्षा पल्लवीताई काकडे, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर