शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कचऱ्यातील आळ्यांचे फुलपाखरू होण्याची वाट बघता का?, साताऱ्यातील शाहूपुरीमधील महिला आक्रमक

By प्रगती पाटील | Updated: October 3, 2023 13:48 IST

नगरपालिकेत शहर स्वच्छता अंमलबजावणी कक्षात गोंधळ

सातारा : महीनो महिने पालिकेच्या आरोग्य विभागाने शाहूपुरी परिसरातील कचरा न उचलल्याने महिलांनी आरोग्य विभागाला अक्षरशः धारेवर धरले. साठलेल्या कचऱ्यात अळ्या झाल्या आहेत, आता त्या आळ्यांचे फुलपाखरू होण्याची वाट बघताय का? असा खडा सवाल आक्रमक झालेल्या महिलांनी प्रशासनाला विचारला.पालिका प्रशासनाला निवेदन द्यायला आलेल्या महिलांनी निवेदन देण्याबरोबरच स्वच्छता प्रश्न प्रशासनाला धारेवर धरले. शाहूपुरी अंतर्गत असलेल्या कॉलनी, परिसरातील गृहनिर्माण संस्थांच्या कार्यक्षेत्रात लोकसंख्येच्या प्रमाणात अपुरा स्वच्छता कर्मचारी वर्ग कार्यरत असून याचा थेट परिणाम परिसरातील सार्वजनिक स्वच्छतेवर होत आहे.अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये रस्त्यालगत जागोजागी गवताचे प्रचंड साम्राज्य वाढले असून यामुळे वाढल्या जात असलेल्या डासांच्या प्रमाणामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. मध्यतरी गवत छटाई मशिनद्वारे फक्त जास्त करून गणेश मंडळ  परिसरातील गवत छटाई केली आहे. त्याचा इतरांना काय उपयोग? असा सवाल महिलांनी केला.

फवारणीचा नाही ताळमेळकोणत्याही प्रभागात सार्वजनिक कार्यक्रमाच्या आधी फवारणी करण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असते. यंदा स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला कार्यक्रम झाल्यानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पावडर फवारणी केल्याचा महिलांनी आरोप केला. 

पालिकेने केले साफ दुर्लक्ष सातारा पालिका हद्दीत शाहूपुरी भागाचा समावेश झाल्यापासून या भागाकडे पालिकेने सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप महिलांनी केला. ग्रामपंचायत असताना वेळच्यावेळी घंटागाडी येणे, स्वच्छता, पथदिव्यांची उत्तम व्यवस्था अशा सोयी होत्या. मात्र, पालिकेच्या गलथान कारभारामुळे या भागामध्ये राहणं ही मुश्किल वाटू लागल्याच्या भावना महिलांनी यावेळी अधिकाऱ्यांकडे व्यक्त केल्या.

जीपीएस अन् फोटोचे कौतुक नकोस्वच्छतेबाबत सातारा पालिका कायम आग्रही असून कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची केलेली कामे जीपीएस लोकेशन आणि फोटोसह पालिकेकडे रोजच्या रोज येत असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी महिलांना सांगितले. यावर आक्रमक महिलांनी जीपीएस आणि फोटोचे कौतुक आम्हाला नको आमच्या भागात स्वच्छता नाही हे वास्तव आहे. स्वच्छता महत्त्वाची आहे आणि आमच्या भागात ती झाली पाहिजे हेच आम्हाला समजते अशी भूमिका घेतली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWomenमहिला