शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

बाईच्या जातीनं.. सोसावं जरा संसारासाठी विवाहितांची कुचंबणा : प्रत्येक पावलावर सहन करण्याचा विट आल्यावर मनस्तापातून होते कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 12:48 AM

सातारा : पती-पत्नी संसाराची समान चाके आहेत, असे कितीही घसा फोडून कोणी सांगितले तरी वास्तवात घराघरांत ‘बाईच्या जातीनं सोसावं जरा संसारासाठी’ हे वाक्य ठरलेलं असतं.

ठळक मुद्दे आत्महत्येची कारणमीमांसा

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : पती-पत्नी संसाराची समान चाके आहेत, असे कितीही घसा फोडून कोणी सांगितले तरी वास्तवात घराघरांत ‘बाईच्या जातीनं सोसावं जरा संसारासाठी’ हे वाक्य ठरलेलं असतं. माहेर-सासर, पाहुणे, मुलं, पती, नातेवाईक या सर्वांना सांभाळताना होणारी कसरत आणि त्यातून येणाऱ्या अपमानास्पद प्रसंगामुळे जगणं संपविण्याचा विचार महिला करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.साताऱ्यात महिलांचे आत्महत्येचे प्रमाण काही दिवसांत वाढले आहे. लग्नानंतर महिलांची अवस्था कुंपणावर असलेल्या दोडक्यासारखी होते, असे काहींचे म्हणणे आहे. कोणतीही अडचण आली की माहेरचे लोक सासरकडे आणि सासरचे माहेराकडे बोट करतात, असे महिला सांगतात.बºयाचदा मुलीचा संसार वाचविण्यासाठी माहेरचे लोकही सासरच्या मंडळींपुढे मुलींना दोषी ठरवतात, हे धक्कादायक वास्तव काही प्रकरणांमध्ये समोर आले आहे.‘तुला सांभाळायला काही नाही; पण जग नावे ठेवायलाच बसलाय, जगासाठी आपला संसार टिकवलापाहिजे, सगळ्याच बायकांना त्रास होतो, म्हणून काय त्या येतात का तुझ्यासारखं पळून,’ ही वाक्ये महिलांना सरावाची झाली आहेत.उठता बसता घरातून होणारी शेरेबाजी, मानापमानाच्या गोष्टी, कामात उशीर म्हणून ओरड, मद्यपी पतीकडून होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास अशी एक ना अनेक कारणे महिलांचे मानसिक खच्चीकरण करत असतात. मात्र, सासरच्या लोकांनी कितीही मानहानीकारकपणे वागणूक दिली तरीही ‘सहन कर’ हे ब्रह्मवाक्य ज्यांना सोसवत नाही, त्या मृत्यूला कवटाळणं पसंत करतात.महिलांची नैसर्गिक रचना मृदू आहे. मात्र, आत्महत्या करताना ती भलतीच कठोर होते. स्वयंपाक करताना बसलेला छोटा चटका किती वेदनादायी आहे, हे माहीत असूनही ती रॉकेल टाकून स्वत:ला पेटवते. तिचे ही कृत्य तिच्यातील मनस्ताप व्यक्त करणारे आहे. आगीच्या ज्वाळेत स्वत:ला झोकून देण्यासाठी लागणारं धाडस तिला हतबलतेतून येतअसते.आपल्या भविष्याची सुंदर स्वप्न ज्या मुलांच्या रुपाने महिलांच्या आयुष्यात अवतरलेली असतात, त्यांनाही आपल्या पश्चात कोण सांभाळणार, आपण असताना त्यांना कोणी नीट बघितले नाही, मग आपल्या पश्चात कोण बघेल हा विचार करून कठोर आई बनून महिला आत्महत्या करताना मुलांनाही सोबत घेतल्याचे दिसत आहे. या घटनासमोर आल्यानंतर मन सुन्नहोतं.आत्महत्यापूर्वी लक्षणेपुरुषांसारखं महिला कोणतीच भावना मनात ठेवत नाहीत. घरात होणाºया त्रासाविषयी महिला माहेरी सांगतात. अनेकदा माहेरच्या माणसांनाही त्या आत्महत्या करावीशी वाटते, हे बोलून दाखवतात. पण नैराश्यातून आलेले हे वाक्य असल्याचा कुटुंबीयांचा कयास असतो. शेजारी, जवळचे नातेवाईक, पालक यांच्यापेक्षाही महिलांना त्यांचा भाऊ आणि वहिनी अधिक जवळ वाटतात. त्यांच्याशी बोलताना त्या मनातील भावना व्यक्त करतात. पण दुर्दैवाने त्याकडे गांभीर्याने बघितले नाही. नोकरी करणारी महिला असेल तर सहकाºयांशी याविषयावर बोलते.साताऱ्यातील काही उदाहरणेकोरेगाव येथील एका विवाहितेने पती बाहेरगावी गेल्यानंतर आपल्या दीड महिन्याच्या मुलीसह बाथरूममध्ये जाऊन पेटवून घेतले. आत्महत्या करण्यापूर्वी तिने त्याविषयीचा मेसेज भावाला केला होता.कºहाड तालुक्यातील एक विवाहिता आपल्या नऊ वर्षांच्या मुलीबरोबर आपल्या काही नातेवाइकांना भेटली. त्यानंतर घरी परतताना तिने तिच्या मुलीसह स्वत:ला गळफास घेतला आणि मृत्यूला कवटाळले.

ही काही कारणेमाहेरच्या माणसांवरून होणारी मानहानीकारक टिप्पणीसण समारंभ आणि लग्नात न झालेले मानपान यामुळे शेरेबाजी,पतीचा संशयी स्वभाव,या जगात आपले कोणीच नाही ही असुरक्षिततेची भावना,सारखी तडजोड मीच करायची ही हतबलता!