शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

Satara Crime: डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून महिलेने केला प्रियकराचा खून; पोलिसांना फोन करुन स्वतःच दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 11:45 IST

खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

मलकापूर : डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून महिलेने प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आगाशिवनगर मलकापूर कराड येथील इंगवलेवस्ती येथे आज, मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. खून केल्यानंतर संबंधित महिलेनेच खुनाबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करत महिलेस ताब्यात घेतले. खुनाचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.राजेंद्र मरीआप्पा काळे (वय-४५ रा. शिवाजी स्टेडियम च्या पाठीमागे कराड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर सारिका चंद्रकांत कोळी (४० रा. इगवले वस्ती आगाशिवनगर, मलकापूर) असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्यामुळे सारिका कोळी ही महिला इंगवलेवस्ती, येथे चार वर्षांपासून तीन मुलीसह वास्तव्यास आहे. दोन मुलींचे विवाह झाले आहेत. एका लहान मुलीसह ती सध्या एकटीच राहत होती. मंगळवारी रात्री प्रियकर राजेंद्र काळे हा तिच्या घरी आला. पहाटे दोघांच्यात भांडण झाले असावे. भांडणाच्या रागात संबंधित महिलेने प्रियकराच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून त्याचा खून केला. खून केल्यानंतर स्वतः तिनेच पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने भेट दिली. घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेहासह खून करणाऱ्या महिलेस ताब्यात घेतले आहे. खुनाचे नेमके कारण काय याचा पोलिस तपास करीत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Satara: Woman Murders Lover with Axe, Informs Police

Web Summary : In Malakapur, a woman killed her lover with an axe after an argument. She then called the police to report the crime. The police have arrested the woman and are investigating the motive.