शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

‘सीबीआय’ अधिकारी असल्याचे भासवून तरुणीने घातला गंडा

By admin | Updated: July 28, 2015 23:29 IST

तरुणाची फिर्याद : पोलिसात नोकरीच्या आमिषाने उकळले दोन लाख

सातारा : आपण ‘सीबीआय’ अधिकारी असल्याचे भासवून तरुणाला पोलिसात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून तरुणीने दोन लाखांना गंडा घातल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. विशेष म्हणजे, संशयित तरुणीनेच आधी या तरुणाविषयी तक्रार दाखल केली होती आणि त्यातही आपण ‘सीबीआय’ अधिकारी असल्याचे म्हटले होते. अरुणा रामचंद्र नलवडे (वय २७, रा. न्हाळेवाडी, ता. सातारा) असे संशयित तरुणीचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी तिने सातारच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे एक लेखी तक्रार नोंदविली होती. ‘एक युवक मला सतत फोन करतो आणि त्रास देतो,’ असे तिने तक्रारीत म्हटले होते. संबंधित तरुणावर कारवाई केली जावी, असे तिने नमूद केले होते. या तक्रारीत तिने आपण ‘सीबीआय’ अधिकारी आहोत, असे म्हटले होते. तक्रारीनुसार गुन्हे शाखेने तपास सुरू केल्यावर वेगळीच माहिती हाती लागली. पोलिसांनी संबंधित मुलाला ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणून त्याचा जबाब घेतला. आपण अरुणाला फोन करतो, हे त्या तरुणाने मान्य केले; मात्र ते तिला त्रास देण्यासाठी नव्हे, तर आपले काम कुठवर आले आहे हे पाहण्यासाठी करीत होतो, असे त्याने सांगितले. अरुणा ‘सीबीआय’ अधिकारी असल्याचे तिने आपल्याला सांगितले होते आणि पोलिसात नोकरी देण्यासाठी तिने आपल्याकडून दोन लाख रुपये उकळले, असा जबाब त्याने दिला. पोलिसांनी शहानिशा करण्यासाठी अरुणाला बोलावून घेतले आणि खरा प्रकार उघड झाला. यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला पोलीस वैशाली घाडगे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक साबळे तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)‘सीबीआय’चे व्हिजिटिंग कार्डतरुणाचा जबाब घेतल्यानंतर जेव्हा पोलिसांनी अरुणाला भेटण्यास बोलावले, तेव्हा तिने आपण ‘सीबीआय’ मध्ये असिस्टंट कमिशनर असल्याचे सांगितले. याचा काही पुरावा आहे का, असे विचारताच तिने व्हिजिटिंग कार्ड दाखविले. कार्डवरील माहितीची स्थानिक गुन्हे शाखेने शहानिशा केली असता, हे कार्डही बोगस असल्याचे उघडकीस आले आणि अरुणाचे पितळ उघडे पडले. दरम्यान, न्यायालयाने अरुणाला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.