शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सलाइनच्या बाटल्यांआडून दारूचा प्रवास

By admin | Updated: March 18, 2015 00:06 IST

दोन ट्रक जप्त : तिघांना अटक करून विदेशी मद्याचे १००४ बॉक्स ताब्यात

सातारा : कऱ्हाडनजीक भुयाची वाडी आणि शिवडे येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा मारून चोरट्या दारूचे दोन ट्रक पकडले. या कारवाईत विदेशी मद्याचे तब्बल १००४ बॉक्स जप्त करण्यात आले असून, तिघांना अटक करण्यात आली आहे. सलाइनच्या बाटल्यांमागे दडवून या दारूची वाहतूक करण्यात येत होती. दोन्ही वाहनांसह ६० लाख ६० हजार ८४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पकडलेली दारू गोवा बनावटीची आहे. राज्य उत्पादन शुल्क सातारा विभागाचे अधीक्षक प्रदीप वाळुंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली साताऱ्याचे भरारी पथक आणि पाटणच्या उपनिरीक्षकांनी ही कारवाई केली. कऱ्हाड ते सातारा मार्गावर दोन आयशर ट्रक (एमएच २३ डब्ल्यू ९१८ आणि एमएच ४३ ई ८१५९) जप्त करण्यात आले. रामदास महादेव डांगे (रा. नेले, ता. सातारा), बबलू कुमार यादव (रा. हाजीगडी, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) आणि बन्सराज श्रीहरीराम भारती (रा. देवरा, जि. फैजाबाद, उत्तरप्रदेश) या तिघांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. चोरट्या मद्याची वाहतूक गोव्याकडून पनवेल-मुंबई आणि औरंगाबादकडे केली जात होती, असे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. प्रत्येक ट्रकमध्ये दोन चालक असावेत आणि त्यातील एक पळून गेला असावा, असा कयास आहे.दारूची वाहतूक करण्यासाठी एका ट्रकच्या मागील भागात सलाइनच्या बाटल्या रचून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामागे दारूचे बॉक्स लपविण्यात आले होते. दुसऱ्या ट्रकच्या मागील बाजूस प्लास्टिकचे चघळ आणि चिंंध्या असलेली गाठोडी आढळून आली. त्यामागे दारूचे बॉक्स ठेवण्यात आले होते. (प्रतिनिधी)ट्रकच्या आत चोरकप्पेचोरटी दारू लपविण्यासाठी प्लास्टिक चघळ आणि सलाइनच्या बाटल्यांचा आडोसा तर करण्यात आलाच होता; शिवाय या दोन्ही ट्रकमध्ये आतील बाजूस चोरकप्पे तयार केल्याचे आढळून आले. या कप्प्यांवरील झाकण नट-बोल्टने बसविण्यात आले होते. नट उघडताच चोरकप्पा उघडेल, अशी रचना होती. एका ट्रकच्या चोरकप्प्यात ८० बॉक्स तर दुसऱ्या ट्रकच्या चोरकप्प्यात १२४ बॉक्स आढळून आले.