सातारा : जिल्हा परिषदेचे सदस्य सतीश चव्हाण यांच्या पत्नीने आज (शनिवारी) सकाळी कृष्णा नदीच्या पात्रात आत्महत्या केली. जयश्री सतीश चव्हाण (वय ४५, रा. महागाव, ता.सातारा) असे त्यांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, महागाव येथील कृष्णा नदीच्या पात्रात शनिवारी सकाळी जयश्री यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांच्या प्राथमिक तपासणीनुसार जयश्री यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी जवळच्या नातेवाइकाचे निधन झाले होते. त्यामुळे त्या तणावाखाली होत्या. यातूनच हा प्रकार घडला असावा, असे पोलिसांचे म्हणणे आहे. शहर पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली असून, हवालदार मर्ढेकर अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
जिल्हा परिषद सदस्याच्या पत्नीची कृष्णा नदीपात्रात आत्महत्या
By admin | Updated: August 23, 2014 23:47 IST