शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर कप’च्या धर्तीवर तिरकवाडी ग्रामस्थांकडून तलावाचे रुंदीकरण : जलक्रांतीचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 22:48 IST

फलटण : पाणी टंचाईवर मात करण्याच्या निर्धाराने तिरकवाडी (ता. फलटण) येथील तरुणाईने एकत्रित येत वॉटर कपच्या धर्तीवर श्रमदान केले. येथील पाझर तलावाची खोली व रुंदीकरण केल्याने या तलावातील पाणी साठवण क्षमता ६ लाख ३० हजार लिटरने वाढणार आहे. दरम्यान, पुढील काळातही एकत्रितपणे श्रमदानातून चांगले उपक्रम राबविण्याचा निर्धार येथील युवक व ...

ठळक मुद्देयुवकांकडूनही उत्स्फूर्तपणे श्रमदान

फलटण : पाणी टंचाईवर मात करण्याच्या निर्धाराने तिरकवाडी (ता. फलटण) येथील तरुणाईने एकत्रित येत वॉटर कपच्या धर्तीवर श्रमदान केले. येथील पाझर तलावाची खोली व रुंदीकरण केल्याने या तलावातील पाणी साठवण क्षमता ६ लाख ३० हजार लिटरने वाढणार आहे. दरम्यान, पुढील काळातही एकत्रितपणे श्रमदानातून चांगले उपक्रम राबविण्याचा निर्धार येथील युवक व ग्रामस्थांमधून करण्यात आला आहे.तिरकवाडी येथे वॉटर कपच्या धर्तीवर आयोजित एक दिवसीय श्रमदान शिबिरात युवा पिढी एकवटली असून, ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांनी एकाच दिवसात ओढ्यावरील सिमेंट बंधाऱ्याची गळती बंद करून खोलीकरण पूर्ण केले. या निमित्ताने सर्वांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण उभा केला आहे.श्रमदानाचा प्रारंभ गावचे उपसरपंच शिरिषकुमार सोनवलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. यावेळी कृषी पर्यवेक्षक राजेंद्र पाळवे, मंडल कृषी अधिकारी चोपडे, कृषी सहायक डी. टी. मुळीक, ग्रामपंचायत सदस्य बापूराव पवार, पोलीस पाटील अमोल नाळे, श्रीधर कदम, सागर पवार, नितीन पवार, श्रीहरी भिसे, हरिभाऊ खरात, रामभाऊ खरात, नाथा काळे, शीतल लंगडे उपस्थित होते.दरम्यान, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, अभियंता प्रीतम जगताप, अभियंता अजय शितोळे, जाणता राजा फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन डांगे, भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. वि. रा. त्रिपुटे, दामुअण्णा रणसिंग, विंचुर्णीच्या माजी सरपंच अस्मिता निंबाळकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल पिसाळ, उत्तमराव भोसले, सौरभ जाधव, युवराज सोनवलकर, फुलचंद सोनवलकर, विकास सोनवलकर, पंकज शिंदे, आदींसह ग्रामस्थांनी यावेळी श्रमदान केले.रुंदीकरणामुळे साठवण क्षमता ४४ लाख लिटरश्रमदानामुळे सिमेंट बंधाºयाची गळती मोठ्या प्रमाणात बंद होणार आहे. या पाझर तलावाची पाणी साठवणूक क्षमता सुमारे ३८.१४ लाख लिटर होती. परंतु श्रमदानात केलेल्या खोलीकरणाने व रुंदीकरणाने साठवणूक क्षमता आता सुमारे ४४.४४ लाख लिटर एवढी वाढली आहे. त्यामुळे पावसाने पाणीसाठा मोठ्या प्रमाणात वाढून येथील ओढ्याच्या बाजूच्या व परिसरातील विहिरी, बोअर यांना पाणी वाढणार आहे.