शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

दारूदुकाने उघडता तर मंदिरे का नाही ? : देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 11:15 IST

राज्यात दारूची दुकाने सुरू केली. मॉल उघडे केले; मात्र राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. देशातील सगळ्या राज्यांनी ती उघडी केली आहेत, अशा परिस्थितीत मंदिरे उघडण्यासंदर्भातील आग्रह योग्य असून, सरकारने तत्काळ ती उघडी करण्यास परवानगी द्यायला पाहिजे, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

ठळक मुद्देदारूदुकाने उघडता तर मंदिरे का नाही ? : देवेंद्र फडणवीस यांचा राज्य सरकारला सवालशिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काँग्रेस आमदाराचाच विरोध

सातारा : राज्यात दारूची दुकाने सुरू केली. मॉल उघडे केले; मात्र राज्य सरकारने धार्मिक स्थळे बंद ठेवली आहेत. देशातील सगळ्या राज्यांनी ती उघडी केली आहेत, अशा परिस्थितीत मंदिरे उघडण्यासंदर्भातील आग्रह योग्य असून, सरकारने तत्काळ ती उघडी करण्यास परवानगी द्यायला पाहिजे, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला फडणवीस यांनी शुक्रवारी दुपारी भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासोबत चर्चा करून माध्यम प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला.फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रातील जनता जागृत आहे. मंदिरे उघडल्यानंतर तिथे गर्दी होणार नाही. देशापेक्षा महाराष्ट्र राज्य वेगळं नाही, हे सगळ्याच धर्मीयांचं म्हणणं आहे. जनतेची भावना लक्षात घेऊन सरकारने तत्काळ मंदिरे उघडी करावीत.काही दिवसांपूर्वी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कर्नाटकातील मनगुट्टी गावात शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी फडणविसांनी आग्रह धरण्याची मागणी केली होती, त्याबाबत छेडले असता फडणवीस म्हणाले, मुश्रीफांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यांच्याने जे होणार नाही, ते आम्ही करून दाखवू हे त्यांना माहीत आहे.

मनगट्टी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला काँग्रेसच्या आमदारांनी विरोध केला. हे आमदार कर्नाटकात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. विरोधी पक्षाच्या नेत्याला सांगण्याऐवजी मुश्रीफ आपल्या सहकारी पक्षाला का सांगत नाहीत. मी तर नक्कीच सांगेन आणि महाराजांचा पुतळा उभा करण्यासाठी जिथे गरज असेल तिथे आंदोलन करेन. मात्र, या प्रकरणात कोणीही विनाकारण राजकारण करू नये.अलमट्टीची उंची ही पूर्वीच्या राज्यकर्त्यांची चूकअलमट्टीची उंची महाराष्ट्राला मान्य नाही. तरी देखील या धरणाची उंची आता वाढू शकत नाही. मात्र, पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी या धरणाच्या उंचीबाबत आक्षेप घ्यायला पाहिजे होता, तो घेतला नाही, ती त्यांची चूक होती. आता काहीही होऊ शकत नाही, असेही फडणवीस यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. 

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस