शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोणाचं हेल्मेट अडगळीत तर कोणाचं गंजलेलं...

By admin | Updated: July 23, 2016 23:48 IST

वापरण्याचा कंटाळा : पेट्रोल भरण्यासंदर्भातील अटींना तरुणांचा कडाडून विरोध

सातारा : हेल्मेट सक्ती करूनही अंमलबजावणी होत नसल्याने राज्य शासनाने हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नाही, असे फर्मान सोडले आहे. परंतु, अजूनही हेल्मेट वापरण्याची कोणाची मानसिकता दिसत नसल्याचे जाणवत आहे. यासंदर्भात विचारणा केली तर ‘हेल्मेट आहे पण माळावर ठेवले आहे,’ ‘त्याची काच फुटली आहे,’ अशी सबबी सांगण्यात आली.रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातून दुचाकी अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तर हेल्मेट वापरले नव्हते म्हणून मृत्यू ओढावल्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे हेल्मेट सक्तीचा वारंवार निर्णय घेतला जातो; पण प्रत्यक्षात मानसिकता अद्याप झालेली नसल्याचे जाणवत आहे. यापूर्वी झालेल्या सक्तीच्या काळात वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई केली जात होती. त्या काळात बहुतांश दुचाकीस्वारांनी हेल्मेट खरेदी केली आहे. तर त्यानंतर अनेक दुचाकी शोरूम चालकांनी गाड्या विकतानाच हेल्मेटही देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘हेल्मेटशिवाय पेट्रोल नाही,’ या निर्णयानंतर ‘लोकमत’ने सातारा शहरातील पेट्रोल पंपावर फेरफटका मारला असता भन्नाट अनुभव आला.घरात हेल्मेट आहे. पण लांब पल्ल्याच्या प्रवासातच ते वापरले जात आहे. हेल्मेट नसेल तर पेट्रोल मिळणार नाही, याची माहिती प्रसारमाध्यमांतून समजल्यानंतर काही दुचाकीस्वारांनी अडगळीतील हेल्मेट बाहेर काढून वापरण्यास सुरुवातही केली आहे, हे पेट्रोलपंपांवर गेल्यावर दिसून येत होते. ज्यांनी हेल्मेट वापरले नव्हते. त्यांच्याशी चर्चा केली तर बोलण्यास कोणीही तयार नव्हते. काहीजण बोलले पण त्यांचा कारणही तसेच देऊर सावरासावर करण्याचा प्रयत्न चालला होता. (प्रतिनिधी)कारणेही तयार..हेल्मेट आहे पण घरात आहे. मंडई खरेदीला आलो होतो. तेवढ्यात पेट्रोल संपले. म्हणून तसाच आलो आहे. माळावर ठेवून दिले होते. घरचे बाहेरगावी गेलेत. काढून द्यायला कोणी नसल्यामुळे नाही आणलं. चार दिवसांपूर्वीच हेल्मेटची काच फुटली. ती खाली लोंबकळत असल्याने दुरुस्त करावे लागणार आहे.घरात एकच हेल्मेट आहे. पण वडिलांनी नेल्यामुळे आणता आले नाही.धंदा करायचा का नाहीयासंदर्भात पेट्रोल भरणाऱ्याकडेच विचारणा केली असता ते म्हणाले, ‘हेल्मेट वापरले पाहिजे हे भल्यासाठीच आहे. त्यासाठी पोलिसांनी दंड करावा. आम्ही पेट्रोल नाही दिले तर दुसरे कोणी तरी देईल. आम्ही धंदा करायचा का नाही?