शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माढ्याच्या रणांगणात सरशी कोणाची? निकालाबाबत उत्सुकता : प्रमुख उमेदवारांकडून विजयाचे दावे

By admin | Updated: May 15, 2014 23:37 IST

माढा : काँग्रेस आघाडीमधील सुंदोपसुंदी, भाऊबंदकी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, अपक्ष उमेदवार प्रतापसिंह मोहिते - पाटील यांच्या आक्रमक

माढा : काँग्रेस आघाडीमधील सुंदोपसुंदी, भाऊबंदकी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना, अपक्ष उमेदवार प्रतापसिंह मोहिते - पाटील यांच्या आक्रमक प्रचारामुळे माढ्याचे ‘रण’ लक्षवेधक ठरले. या रणांगणातील तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? याबाबत सोलापूर जिल्ह्यात कमालीची उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागल्यापासूनच शरद पवारांनी सर केलेला माढा मतदारसंघ राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवारीवरून चर्चेत आला. जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय शिंदे या मतदारसंघात प्रयत्नशील होते; पण विजयसिंहांचे ज्येष्ठत्व, त्यांच्या पुनर्वसनाला प्राधान्य आणि विजयाचे गणित मांडून शिंदे यांना डावलून मोहिते-पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. तत्पूर्वी त्यांचे धाकटे बंधू आणि माजी मंत्री प्रतापसिंह मोहिते - पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केल्यामुळे मोहिते -पाटील घराण्यातील भाऊबंदकी पुन्हा चव्हाट्यावर आली अन् या मतदारसंघाचे राज्याचे लक्ष वेधले. विजयसिंह यांना प्रचाराच्या प्रारंभीच्या काळातच काँग्रेस आघाडीमधील उभ्या दाव्याला सामोरे जावे लागले. महायुतीकडून लढणार्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदाभाऊ खोत आणि अपक्ष उमेदवार प्रतापसिंह मोहिते - पाटील यांनी मतदारसंघात मुद्यांवर आधारित प्रचार केला. प्रतापसिंह हे आपल्या ज्येष्ठ बंधूवर थेट हल्ले चढवित असल्यामुळे त्यांच्या प्रचारसंभांना चांगला प्रतिसाद मिळाला. खोत यांनी ग्रामीण मतदारांना आकर्षित करणार्‍या शैलीत शेतकर्‍यांचे प्रश्न मांडून प्रचारसभा गाजविल्या. शिवाय त्यांच्यासाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांनी आवर्जुन सभा घेऊन लढत अधिकच लक्षवेधी केली. राष्टÑवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी माढा हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ असल्यामुळे त्यांनी जातीने या मतदारसंघात लक्ष घातले होते. टेंभूर्णी, सांगोला, करमाळा आणि फलटणमध्ये पवारांनी सभा घेऊन विजयसिंहांना विजयी करण्याचे आवाहन केले. अजित पवारांनी निवडणूक प्रचार काळात परदेशस्थ असलेल्या संजय शिंदे यांना फटकारल्यामुळे त्यांचीही सभा गाजली. काँग्रेस आघाडी, महायुती आणि प्रतापसिंहांसह मतदारसंघात बहुजन समाज पक्षाचे कुंदन बनसोडे, हिंदू प्रजा पक्षाचे नवनाथ पाटील, ‘आप’च्या सविता शिंदे, तृणमूल काँग्रेसचे सुरेश घाडगे हे नशीब आजमावित आहेत. (प्रतिनिधी)