शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

१५ दुष्काळी गावे म्हणतायंत, ‘टँकर म्हणजी काय’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 00:08 IST

सातारा : दरवर्षी ज्या गावांना डिसेंबर महिन्यातच टँकरची वाट पाहावयास लागायची, त्या ठिकाणी यंदा पाण्याची आबादी सल्याचं सुंदर चित्र दिसू लागलंय. ही किमया घडलीय लोकसहभागातून पाणी साठविण्याच्या चळवळीमुळे.

नितीन काळेल ।सातारा : दरवर्षी ज्या गावांना डिसेंबर महिन्यातच टँकरची वाट पाहावयास लागायची, त्या ठिकाणी यंदा पाण्याची आबादी असल्याचं सुंदर चित्र दिसू लागलंय. ही किमया घडलीय लोकसहभागातून पाणी साठविण्याच्या चळवळीमुळे. वॉटरकप स्पर्धेमुळे जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यातील जलसाठे वाढून अनेक गावांचे पाणी टँकर बंद झाले आहेत. यामध्ये माण तालुक्यातील जवळपास १५ गावे ही वॉटर कपमधील सहभागामुळे सद्य:स्थितीत टँकरमुक्त झाली आहेत.

राज्यात तीन वर्षांपासून अभिनेता अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धा सुरू झाली आहे. पहिल्यावर्षी या स्पर्धेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. सातारा, बीड आणि अमरावती हे तीन जिल्हे या स्पर्धेत सहभागी होते. यामध्ये सातारा जिल्ह्यानेच अंतिम बाजी मारत प्रथम क्रमांक मिळविला होता.

कोरेगाव तालुक्यातील वेळू गावाने हा क्रमांक पटकावला होता. दुसºया स्पर्धेसाठी राज्यातील १३ जिल्हे उतरले होते. तर ३० तालुक्यांतील सुमारे १२०० हून अधिक गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. सातारा जिल्ह्याने दुसºया वर्षीही मोठ्या प्रमाणात व सक्रिय असा सहभाग नोंदवला. जिल्ह्यातील ९६ गावे या स्पर्धेत उतरली होती. त्यामध्ये अधिक करून माण तालुक्यातील ३२ गावांचा सहभाग होता. जवळपास या सर्वच गावांमध्ये जलसंधारणाचे मोठे काम झाले आहे. वॉटर कप स्पर्धेच्या तिसºया टप्प्याची तयारी सुरू असून, यावर्षीही सातारा जिल्ह्यातील २०० च्यावर दुष्काळी गावांचा सहभाग राहणार आहे.

तीन वर्षांपासून सुरू असणाºया या स्पर्धेचा फायदा असा झाला की, दुष्काळी तालुक्यातील अनेक गावे टँकरमुक्त झाली आहेत. उन्हाळ्यातील पिकांसाठीही उपलब्ध पाण्याचा वापर करता येत आहे. माण तालुक्यात तर वॉटर कप स्पर्धेंतर्गत मोठे काम झाले आहे. त्यामुळे जवळपास १५ गावांना यावर्षी टँकर सुरू करायला लागणार नाहीत. शिरवली, सत्रेवाडी, बिदाल, परकंदी, परतवडी, सुरुपखानवाडी, पिंगळी खुर्द, वाकी, जाशी, थदाळे, कारखेल, मोगराळे, अनभुलेवाडी आदी गावांचा त्यामध्ये समावेश आहे. यामधील कारखेल गावाला तर दरवर्षी डिसेंबर महिन्यातच टँकर सुरू करायला लागायचा. लोकांना पाण्यासाठी भटकंती करायला लागायची; पण यावर्षी तेथील चित्र बदलले आहे.खटावमधील गाव टँकरमुक्त...वॉटरकपमध्ये गेल्यावर्षी खटाव तालुक्यातील २८ गावांनी काम केले. त्यातील नागाचे कुमठे हे गाव टँकरमुक्त झाले आहे. यावर्षीही या गावाने या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तसेच इतर गावेही या स्पर्धेच्या माध्यमातून टँकरमुक्त होत आहेत.