शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

खंडणीचा गुन्हा दाखल झाला तेव्हा शेखर गोरे परराज्यात: सुरेखाताई पखाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 23:27 IST

दहिवडी : ‘वरकुटे-मलवडी येथील सौरऊर्जा कंपनीविरोधात शेतकºयाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शेखरगोरे लढत होते.

ठळक मुद्दे कारवाईच्या विरोधात दहिवडीत आज राष्टÑवादी कार्यकर्त्यांचा मेळावा२५ आॅक्टोबरला कोलकत्ता ते मुंबई असा विमान प्रवास करत होते.

दहिवडी : ‘वरकुटे-मलवडी येथील सौरऊर्जा कंपनीविरोधात शेतकºयाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शेखरगोरे लढत होते. याचाच राग मनात धरून राजकीय षडयंत्र रचत शेखर गोरे राज्यातही नसताना त्यांच्यावर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल केला. याविरोधात जनता आक्रमक झाली,’ अशी माहिती त्यांच्या भगिनी सुरेखाताई पखाले यांनी दिली.दहिवडी येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी माण पंचायत समितीचे सभापती रमेश पाटोळे, उपसभापती नितीन राजगे, नगराध्यक्ष तुषार विरकर उपस्थित होते.

पखाले म्हणाल्या, ‘वरकुटे-मलवडी येथील शेतकरी बापूराव हणमंत जगदाळे यांची जमीन कंपनीने घेतलेल्या जमिनीलगत होती. त्यांच्या मिळकतीत संबंधित कंपन्यांनी बेकायदेशीर व औद्योगिक अकृषिक कामे सुरू केली होती. जमिनीची वाटणी झालेली नसल्याने स्वतंत्र वहिवाटी नव्हत्या. तरीही कंपन्यांनी कामे सुरूच केली होती. याविरोधात संबंधित शेतकºयाने प्रशासनाकडे १२ सप्टेंबर रोजी निवेदन देऊन कंपनीचे काम चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवावे, अशी मागणी केली होती. मात्र प्रशासनाने त्यांची दखल घेतली नव्हती. त्यामुळे त्या शेतकºयाने शेखरभाऊ गोरे यांच्याकडे न्याय मिळवून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शेखर गोरेंनी प्रशासनाकडे निवेदनाद्वारे कंपनीविरोधात कारवाईची मागणी केली. निवेदनाची प्रशासनाने तत्काळ दखल घेत २२ सप्टेंबर रोजी बेकायदा उत्खनन करून कंपनीच्या परिसरात उभारलेली वाहने, बेकायदा उत्खनन, बांधकाम तसेच गौण खनिजसाठा केल्याबाबतचा पंचनामा केला होता. प्रशासनाने अनधिकृत गौनखनिज उत्खननप्रकरणी संबंधित कंपन्यांना नोटीस पाठविली होती. याचा राग मनात धरून कंपनी व्यवस्थापनाने षडयंत्र रचत शेखरभाऊ गोरे यांच्यावर खंडणी व इतर गुन्हे दाखल केले.’ पाहता शेखर गोरे हे २१ आॅक्टोबर रोजी हैद्राबाद ते कोलकत्ता तर वरकुटे-मलवडी कंपनीत प्रकार घडला त्यादिवशी २५ आॅक्टोबरला कोलकत्ता ते मुंबई असा विमान प्रवास करत होते.

विमान तिकीट, तेथील सीसीटीव्ही फुटेजही पाहिले तर सत्यता बाहेर पडणार आहे. तरीही त्यांचे नाव याप्रकरणात गोवण्यात आले. कायदेशीर कागदपत्रांती पूर्तता करताना शेखर गोरे यांनी आपण परराज्यात असल्याचे सबळ पुरावे सादर केले आहेत. तरीही प्रशासनाने राजकीय दबावापोटी त्यांच्या नावावर गुन्हे दाखल करत मोक्क्याची चुकीची कारवाई केली आहे,’ असा आरोपही पखाले यांनी केला. 

कंपनीने माझ्या मिळकतीत काम सुरू केल्याची तक्रार मी प्रशासनाकडे केली होती. प्रशासनाने दखल न घेतल्याने मी शेखर गोरे यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर त्यांनी याबाबत प्रशासनाला निवेदन दिले होते. याचाच राग मनात धरत खोटी कारवाई केली आहे.- बापूराव हणमंत जगदाळे, वरकुटे-मलवडीशेखर गोरे हे स्वत:च्या कुटुंबापेक्षा जनतेसाठी जास्त वेळ देतात. त्यांनी जनतेसाठी खूप कामे केली आहेत. आता भाऊंच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची वेळी आली आहे. चुकीच्या कारवाईमुळे कार्यकर्त्यांवर आघात झाला आहे. या परिस्थितीचा धैर्याने सामना करू या. यातून ते निश्चितच बाहेर पडणार आहेत.- सोनलताई गोरे