शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

‘व्हॉटसअ‍ॅप’ कशाला? चला भेटायला!

By admin | Updated: October 9, 2014 23:01 IST

उन्हा-तान्हात प्रचार : उमेदवारांबरोबरच कुटुंबीयही आले ‘एसी’तून बाहेर

प्रमोद सुकरे - कऱ्हाड -फेसबुक, व्हॉटसअ‍ॅपच्या माध्यमातून क्षणार्धात घराघरात पोहोचता येत असलं तरी निवडणुकीत हे सगळे फंडे वापरून शिवाय प्रचारासाठी उमेदवारांसह त्यांच्या कुटुंबीयांची धावपळ होतेय़ प्रत्यक्ष भेटीवर भर दिला जातोय़ पूर्वी वरिष्ठ नेत्यांच्या सभा ऐकायला लोक मैलोनमैल चालत यायचे़ नेतेही मोटारीतून यायचे. मध्यंतरीच्या काळात यात थोडे बदल होऊन विमान, हेलिकॉप्टरमधून येणाऱ्या नेत्यांच्या दिवसात चार-पाच सभा होऊ लागल्या़ प्रवासाची साधनं सुलभ झाल्याने माणसंही मोठ्या संख्येने येऊ लागली़ अलीकडच्या पाच-दहा वर्षात माध्यमे प्रचंड प्रभावी झाली आणि इंटरनेटच्या माध्यमातूनही घटना लगेच देश-विदेशात पोहोचू लागली़ सोशल मीडिया आला आणि एका मिनिटात घराघरात पोहोचता येऊ लागले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा प्रभाव दिसून आल्याने विधानसभा निवडणुकीतही सर्वच पक्षांनी या माध्यमांचा वापर करण्यावर भर दिलाय़ मोबाईलवर उमेदवारांच्या प्रचाराच्या ‘पोस्ट’ धडाधड पडत असून, त्या ‘डिलीट’ करताना मतदार वैतागून जातोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.प्रचाराची ही सर्व साधने उपलब्ध असताना आणि त्यांचा वापर जोरात सुरू असतानाही उमेदवारांना विजयाची खात्री दिसत नाही़ त्यामुळे उमेदवार, त्यांचे कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांनी अक्षरश: पायात भिंगरी लावल्याचे दिसत आहे. एरवी एसी केबिनमध्ये बसणारे, एसी गाडीतून फिरणारे उमेदवार व त्यांचे कुटुंबीय उन्हातान्हात फिरताना घामेघूम होत आहेत. अनेकांचे वजन त्यामुळे कमी झालंय म्हणे! सोशल मीडिया कितीही प्रभावी ठरत असला, तरी थेट प्रचाराला पर्याय नाही, हे या निवडणुकीने दाखवून दिले आहे. महिलाही सक्रिय अनेक राजकीय नेत्यांच्या कुटुंबातील महिला सार्वजनिक कामात अपवाद वगळता थोड्याच प्रमाणात दिसतात़ पण यंदाची निवडणूक इतिहासातील एक महत्त्वाची निवडणूक असल्याने उमेदवारांच्या अर्धांगिनी, मातोश्री, बहिणी, स्नुषा प्रचारात सक्रिय दिसताहेत़ ‘आॅक्टोबर हिट’वर ‘इलेक्शन हिट’ची मातएरव्ही आॅक्टोबर महिन्यातील ऊन आरोग्यासाठी हानिकारक असते़ त्यापासून बचावण्याची काळजी घेतली जाते. पण याच महिन्यात आलेल्या निवडणुकांमुळे उमेदवार, कार्यकर्ते त्यावर मात करीत प्रचारात सक्रिय दिसत आहेत़