शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही ३०० दहशतवादी मारून बदला घेतला, सातारकरांच्या प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 13:36 IST

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन शेकडो दहशतवादी मारल्यानंतर सातारकरांनी मोती चौकात फटाके वाजवत साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पाकिस्तानचा निषेध करत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागतही केले. तुम्ही ४० जवानांना मारले; पण आम्ही 3०० दहशतवादी मारून बदला घेतला, अशा प्रतिक्रिया सातारकरांनी व्यक्त केल्या.

ठळक मुद्देआम्ही ३०० दहशतवादी मारून बदला घेतला, सातारकरांच्या प्रतिक्रियापाकिस्तानचा निषेध; फटाके फोडले, साखर अन् पेढे वाटून आनंदोत्सव

सातारा : भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन शेकडो दहशतवादी मारल्यानंतर सातारकरांनी मोती चौकात फटाके वाजवत साखर व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पाकिस्तानचा निषेध करत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागतही केले. तुम्ही ४० जवानांना मारले; पण आम्ही 3०० दहशतवादी मारून बदला घेतला, अशा प्रतिक्रिया सातारकरांनी व्यक्त केल्या.जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांवर आत्मघातकी हल्ला केला होता. यामध्ये ४० जवानांना वीरमरण आले होते. त्यामुळे भारतीय हवाई दलाने मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास पाकमधील हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट केले. हवाई दलाच्या या सर्जिकल स्ट्राईकमध्ये सुमारे ३०० दहशतवादी मारले गेल्याचा अंदाज आहे. भारताच्या या सर्जिकल स्ट्राईकचे वृत्त साताऱ्यात धडकताच नागरिकांनी मोती चौकात एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.मोती चौकात शेकडोच्या संख्येने एकत्र येत सातारकरांनी फटाके वाजविले. तसेच साखर अन् पेढे वाटण्यात आले. रस्त्यावरून जाणारे वाहनचालक, दुकानदार, सातारकर नागरिकांना पेढे वाटून हा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी भाजपचे जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार, नगरसेवक विजय काटवटे, किशोर पंडित, नगरसेविका आशा पंडित, किशोर गोडबोले, सुनील काळेकर आदी उपस्थित होते.जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक पवार म्हणाले, ह्य१४ फेब्रुवारी रोजी दहशतवाद्यांनी भारतीय सैनिकांवर हल्ला करून ४० जणांना ठार केले होते. त्यामुळे भारतीयांच्या मनात दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानबद्दल तीव्र संताप व्यक्त होत होता. मंगळवारी पहाटे भारताच्या हवाई दलाने पाकमध्ये जाऊन दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. यामध्ये ३०० हून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. तुम्ही आमचे ४० मारले; पण आम्ही ४०० मारू, हेच भारताने आता दाखवून दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाSatara areaसातारा परिसर